शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोऱ्या नंबरप्लेटवरून सापडला चोर

By admin | Updated: May 17, 2015 01:27 IST

१३ दुचाकी जप्त : साताऱ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सातारा : कोऱ्या नंबरप्लेटच्या गाडीवरून एक युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्यावेळी तो अट्टल चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीनंतर त्याने सांगली, सातारा, कोल्हापूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तब्बल १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सयाजी सुदाम थोरात (वय ३०, रा. मायणी, ता. खटाव) असे अटक झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री सयाजी थोरात हा कोऱ्या नंबरप्लेटची दुचाकी घेऊन गोडोलीतून निघाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला तेथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. सांगली, सातारा, कोल्हापूरसह दहिवडी, मिरज या भागातही त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरी केल्यानंतर तो मित्रांना त्या दुचाकी विकत होता. यापूर्वीही त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल झाले असल्याने पोलिसांनी तपास त्याच्यावर केंद्रित केला. कसून चौकशी केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी विकलेल्या १३ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व दुचाकींची किंमत ४ लाख ३० हजार इतकी आहे. थोरातला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक शामराव मदने, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार विलास नागे, बाळासाहेब वायदंडे, संजय शिंदे, आनंदराव भोईटे, मोहन नाचण, प्रवीण शिंदे, शरद बेबले, युनूस मुलाणी, संतोष जाधव, प्रवीण कडव, नितीन भोसले, योगेश पोळ, विक्रम पिसाळ, रूपशे कारंडे, मारुती अडागळे, संजय जाधव यांनी सहभाग घेतला. जवळच्या नातलगाचा हात ! सयाजी थोरात हा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या-मोठ्या चोऱ्या करीत आहे. चोरीच्या गुन्ह्यात अनेकदा त्याला अटकही झाली आहे. कारागृहातून सोडवून आणण्यासाठी त्याला जवळचेच मदत करीत आहेत. कारागृहातून सुटल्यानंतर सयाजी पुन्हा अशाच उचापत्या करीत असे. चोरीसाठी त्याच्या मदतीला अत्यंत जवळचा एक नातलग असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. चोरून दुचाकी आणल्यानंतर सयाजी त्या दुचाकी केवळ पाच-सहा हजारांमध्ये विकत होता.