शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सौर पथदिव्यांच्या बॅटरीवर चोरट्यांचा डोळा

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

चाफळ विभाग : तक्रारी होऊनही पोलिसांचा तपास शून्य

चाफळ : विभागात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून चोरट्यांनी सौर पथदिव्यांच्या बॅटरीवर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांना हे भुरटे चोर सापडत नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. चाफळ विभागात २२ गावे व २३ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. विभागाची भौगोलिक परिस्थीती पाहता बहुतांश गावे डोंगर माथ्यावर वसलेली आहेत. विभागाची लोकसंख्या २७ हजाराच्या आसपास आहे. राम मंदिरास पर्यटनाचा दर्जा मिळाल्यापासून येथे भाविकांची उपस्थीती लक्षनिय असते. यातच विभागाची मुख्य बाजारपेठ चाफळला असल्याने येथे दररोज विभागातील हजारो ग्रामस्थांची ये-जा असते. त्यामुळेच चाफळला पोलीस दुरक्षेत्र उभारण्यात आले आहे. उंब्रज पोलीस ठाण्याअंतर्गत या दुरक्षेत्राचा कारभार सुरु असतो. विभागातील धायटी येथील बौध्दवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सौरउर्जा दिव्याची व नाणेगाव येथील महादेव मंदिर रस्त्यावरील सौरउर्जा दिव्यांच्या बॅटरी चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत चाफळ पोलीसांत अज्ञातांविरोधात तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र चाफळ पोलिसांकडून तपास होत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच येथील पोलीस दुरक्षेत्रास कायमस्वरुपी अधिकारी मिळत नाही. तसेच कर्मचारीही कमी असल्याने त्यांच्याकडून रात्रगस्त घातली जात नाही. (वार्ताहर)