शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आली बेकारी... घेतली सुपारी!

By admin | Updated: April 10, 2015 23:50 IST

चौथा अटकेत : ‘अ‍ॅकॅडमी’ बंद पडल्यानंतर टोळक्याची दिशा चुकली--बजरंग गायकवाड खून प्रकरण

सातारा : पोलीस भरतीपूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारी अ‍ॅकॅडमी ‘त्यांनी’ सुरू केली होती. काही कारणांनी ती बंद पडली. ‘ते’ तरुण बेकार झाले. ‘ईझी मनी’साठी काहीतरी शोधू लागले. त्यातूनच सुपारी घेण्यासारखे खतरनाक उद्योग त्यांचे टोळके करू लागले. त्यातूनच त्यांनी झटपट पैशांसाठी बजरंग गायकवाड यांची सुपारी घेतली, असे तपासात पुढे येत आहे. आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) यांचा अपहरण करून खून करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी कसून प्रयत्न सुरू केले. बजरंग गायकवाड यांचे आर्थिक व्यवहारातून ज्याच्याशी वितुष्ट आले होते, त्या राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार याच्यासह वासुदेव शिवाजी जांभळे, आकाश शरद सोनटक्के या तिघांना अटक झाल्यानंतर या प्रकरणातील क्रौर्य हळूहळू बाहेर येऊ लागले. राजेंद्र पवार याने इतरांना सुपारी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टोळक्यातील इतरांचा शोध सुरू झाला. गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणातील चौथा आरोपी संदीप रावसाहेब भोसले (वय २८, रा. अग्रम धुळगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) याला अटक करण्यात आली.बजरंग गायकवाड यांचे अपहरण करून रहिमतपूरजवळील अंभेरी घाटात जंगलात नेऊन जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सातारा येथे एका खोलीत त्यांना कोंडून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी ते मृतावस्थेत आढळल्यावर आरोपींनी अंभेरी घाटात मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. अंभेरी घाटातील परिस्थिती पाहिली असता आणखी काहीजणांचा सहभाग या प्रकरणात असला पाहिजे, अशी पोलिसांना खात्री पटली. त्या दिशेने तपास करताना अटक तिघांव्यतिरिक्त आणखी किमान तिघा-चौघांचा सहभाग हळूहळू स्पष्ट होत गेला. चौथा आरोपी संदीप भोसले याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. आणखी दोन ते तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळक्यातील दोन-तीन जणांनी पूर्वी भरतीपूर्व परीक्षा मार्गदर्शन अ‍ॅकॅडमी सुरू केली होती. ती बंद पडल्यावर हे तरुण बेकार झाले आणि वाममार्गाला लागले. बजरंग गायकवाड खून प्रकरणातील सहभागाबरोबरच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)गुन्ह्यातील मोटारसायकल जप्तबजरंग गायकवाड यांचा मृतदेह जाळण्यासाठी आरोपी अंभेरी घाटात गेले तेव्हा त्यातील दोघेजण मोटारसायकलवरून गेल्याचे उघड झाले होते. ती पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, संदीप भोसलेला मोबाइल लोकेशनच्या साह्याने रहिमतपूर-अंभेरीदरम्यान पकडण्यात आले. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दि. १२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.