सासवड येथे महात्मा फुले हायस्कूलमध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST2021-01-14T04:33:08+5:302021-01-14T04:33:08+5:30

आदर्की : सासवड (झणझणे), ता. फलटण येथील महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील आयसीटी लॅबचा दरवाजा, कडीकोयंडा तोडून संगणक ...

Theft at Mahatma Phule High School at Saswad | सासवड येथे महात्मा फुले हायस्कूलमध्ये चोरी

सासवड येथे महात्मा फुले हायस्कूलमध्ये चोरी

आदर्की : सासवड (झणझणे), ता. फलटण येथील महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील आयसीटी लॅबचा दरवाजा, कडीकोयंडा तोडून संगणक व साहित्य मिळून ७० हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद लेखनिक विजय भानुदास जगताप यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.

सासवड (झणझणे), ता. फलटण येथे महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज असून, कोरोनामुळे सकाळी १०.३० ते दुपारी दोनपर्यंत शालेय कामकाज व ऑफिस कामकाज पाच वाजेपर्यंत सुरू असते. दि. १२ रोजी रात्री हायस्कूलमध्ये शिपाई गुरव यांनी फोनवरून लेखनिक विजय जगताप यांना चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे सचिव सचिन सूर्यवंशी, मुख्याध्यापिका संगीता काकडे यांनी पाहणी केली असता आयसीटी लॅबचा दरवाजा व कडीकोयंडा तोडून प्रोजेक्टर, संगणक असे सत्तर हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे.

अधिक तपास सहायक फौजदार आप्पा भोसले करीत आहेत.

Web Title: Theft at Mahatma Phule High School at Saswad