Satara: पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द; तालुकाप्रमुखाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:28 PM2024-01-08T12:28:35+5:302024-01-08T12:29:45+5:30

कऱ्हाड : सोशल मीडियावर उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...

Taluk Pramukh arrested for using abusive language against Guardian Minister Shambhuraj Desai | Satara: पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द; तालुकाप्रमुखाला अटक

Satara: पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द; तालुकाप्रमुखाला अटक

कऱ्हाड : सोशल मीडियावर उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखावर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकासाहेब जाधव (रा.मुंढे, ता. कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, रविवारी पोलिसांनी त्याला अटक केले आहे.

याबाबत गुलाबराव गणपतराव शिंदे-पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपवर ‘शिवसेना एकनाथ शिंदे’ नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचा कऱ्हाड तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव हाही त्या ग्रुपमध्ये आहे.

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव याने संबंधित सोशल मीडिया ग्रुपवर पालकमंत्री शंभुराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले. अश्लील भाषेत त्याने त्या ग्रुपवर शिवीगाळ केली. संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना, तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरून त्याने मंत्री देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

काकासाहेब जाधव याने माहिती तंत्रज्ञान उपकरणाचा गैरवापर करून मंत्री देसाई यांना अपशब्द वापरत जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Web Title: Taluk Pramukh arrested for using abusive language against Guardian Minister Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.