शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वीट ‘कॉर्न’ एक नंबर-- ‘लोकमत’संगे जाणून घेऊ

By admin | Updated: July 23, 2014 22:30 IST

मका आहे बहुउपयोगी : खाण्याबरोबरच स्टार्च, कॉर्न पीठ, चायनीज, बेकरी प्रॉडक्टमध्ये वाढला वापर

सातारा - जगात सर्वात जास्त पिकविले जाणारे तिसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. असा हा मका आता सर्वांच्याच जीवनाचा भाग बनत चालला आहे. स्टार्च तयार करण्यासाठी व रोजच्या आहारातील बेकरी प्रॉडक्ट, चायनीज पदार्थ यामध्ये मका इतर पिठांना पर्यायी पीठ म्हणून उपयोगी होऊ लागला आहे.सातारा जिल्ह्यातही मक्याच्या कणिसांची आवक मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यात दिवसाला लाखांच्या पुढे उलाढाल होते. यात सातारा, कऱ्हाड आणि महाबळेश्वर आघाडीवर आहेत.मका सर्वात प्रथम मेक्सिकोमध्ये सुमारे सात हजार वर्षांपूर्वी पिकवला गेला. सध्या अमेरिकेला मक्याचे कोठार म्हटले जाते. मध्य अमेरिकेत मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दैनंदिन खाण्यासाठी ताज्या स्वीट कॉर्नचा वापर केला जातो, तर वाळवलेला मका पीठ, लाह्या व इतर पदार्थांसाठी पिकविला जातो. मक्याचे तेल मोठ-मोठ्या कारखान्यांमध्ये वापरले जाते. तसेच मक्यापासून तयार होणारे कॉर्न स्टार्च याचा वापर कापडांमध्ये केला जातो. याचबरोबर कित्येक खाद्य कंपन्यांत, ‘थिकनिंग एजंट’ म्हणेजच सॉस, पुडिंगसारखा प्रकारांमध्ये दाटपणा येण्यासाठी वापरले जाते. कॉर्न स्टार्च हे सिरप म्हणूनही वापरले जाते. ज्याचा वापर साखरेलाही पर्याय म्हणून गोड पदार्थांमध्ये वापरला जातो. बेबीकॉर्न हे प्रामुख्याने भाज्यांमध्ये, सॅलेडमध्ये वापरले जाते. (प्रतिनिधी)साताऱ्यातील खास ‘मका’ हॉटेलयेथील सदर बझारमध्ये ‘अनिशन’या नावाने मक्याचे विविध खाद्य पदार्थ विक्री करणारे हॉटेल आहे. मक्याचे पॅटीस, कटलेट, स्वीट कॉर्न बर्गर, सूप, रायता, सामोसा, मका राईस, यासारखे पदार्थ मिळतात. महाविद्यालयातील तरूणाई बरोबरच अनेकजण सहकुटुंब हे खाण्याचा आस्वाद घेतात. यातील उपयुक्त पोषक घटकांमुळे सातारकरांना या हॉटेलने भुरळ घातली आहे.