शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आंधळी ठरावाच्या अंमलबजावणीस स्थगिती

By admin | Updated: April 3, 2015 00:35 IST

सहकार न्यायालयाचा निर्णय : प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह; जयकुमार गोरे गटाने दिले होते आव्हान

सातारा : माण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या आंधळी सोसायटीचा सातारा येथे दि. २७ मार्च रोजी झालेल्या बैठकीतील ठरावाच्या अंमलबजावणीला सहकार न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची माहिती काँग्रेसचे दादासाहेब काळे यांनी दिली. आंधळी सोसायटी पदाधिकारी निवडी पोलीस बंदोबस्तात सातारा येथील भूविकास बँकेच्या सभागृहात पार पडल्या होत्या. प्रचंड तणावात पार पडलेल्या या निवडप्रक्रियेवेळी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही संचालकांनी पोलिसांसमोर भाग घेतला होता. त्या निवडप्रक्रियेनंतर लगेचच नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी नवीन ठराव केला होता. आमदार गोरे गटाकडून या निवड व ठराव प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. काँग्रेस संचालकांच्या वतीने अ‍ॅड. अरुण खोत यांनी बाजू मांडली. सातारा येथे झालेल्या बैठकीची नोटीस सोसायटीच्या सहा सदस्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही बैठक बेकायदा असल्याने त्या बैठकीतील ठराव रद्द करून पूर्वीचाच ठराव कायम ठेवण्याचा निकाल सहकार न्यायालयाने दिला.आंधळी सोसायटी निवडणुकीने अनेक प्रश्न सहकार व पोलिसांसमोर उभे केले होते. अगदी इतर सोसायट्यांच्या निवडणुकाही जिल्ह्याच्या ठिकाणीच घेण्याचे नियोजन करण्यात आले. इतकेच काय जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सहकार विभाग कि महसूल विभाग राबविणार, असा प्रश्न निर्माण झाला. (प्रतिनिधी)पदाधिकारी निवडीलाही आव्हानन्यायालयाने दिलेल्या निकालामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंधळी सोसायटीचा पूर्वी झालेला आमदार गोरे यांच्या बाजूचा ठराव कायम राहिल्याने समर्थकांनी आनंद व्यक्त केला. आता सोसायटीच्या पदाधिकारी निवडीलाही आव्हान दिले गेल्याने सहकार क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.