Satara: प्रेमसंबंधांच्या संशयातून ‘त्या’ ऊसतोड मजुराची निर्घृण हत्या, पोलिस तपासात आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:28 IST2026-01-22T14:28:10+5:302026-01-22T14:28:32+5:30

जेवणाचे आमिष दाखवून मच्छिंद्रला घराबाहेर नेले अन् केला खून

Sugarcane worker Machhindra Bhosale was murdered on suspicion of love affair in Bhose area of ​​Koregaon taluka satara | Satara: प्रेमसंबंधांच्या संशयातून ‘त्या’ ऊसतोड मजुराची निर्घृण हत्या, पोलिस तपासात आले समोर

Satara: प्रेमसंबंधांच्या संशयातून ‘त्या’ ऊसतोड मजुराची निर्घृण हत्या, पोलिस तपासात आले समोर

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भोसे हद्दीत प्रेमसंबंधांच्या संशयातून मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४५, रा. भोसे) या ऊसतोड मजुराचा निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात अजय राजेंद्र माने (रा. भोसे) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र भोसले हा पत्नी शीतल, मुलगा सूरज व मुलगी शिवानी यांच्यासह कारखाना परिसरात वास्तव्यास होता. कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम करणाऱ्या अजय माने याचे मच्छिंद्रच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय मच्छिंद्रला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व भांडणे होत होती. 

या कारणावरून अजय माने याने मच्छिंद्रला जिवे ठार मारल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. १५ जानेवारी रोजी सायंकाळी अजय माने याने जेवणाचे आमिष दाखवून मच्छिंद्रला घराबाहेर नेले. त्यानंतर मच्छिंद्र घरी परतलाच नाही. मच्छिंद्रच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अवजड हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला.

Web Title : सतारा: प्रेम संबंध के शक में गन्ना मजदूर की निर्मम हत्या

Web Summary : कोरेगांव में, मच्छिंद्र भोसले नामक एक गन्ना मजदूर की हत्या उसकी पत्नी के अजय माने के साथ प्रेम संबंध के संदेह में की गई। माने ने भोसले को खाने का लालच देकर बाहर बुलाया और भारी हथियार से उसकी हत्या कर दी। पुलिस ने माने के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया है।

Web Title : Satara: Affair Suspicion Leads to Brutal Murder of Sugarcane Worker

Web Summary : In Koregaon, a sugarcane worker, Machhindra Bhosale, was murdered due to suspicion of his wife's affair with Ajay Mane. Mane lured Bhosale out for dinner and killed him with a heavy weapon. Police have filed a murder case against Mane.