शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

साखर स्वस्त; पण गोडवा काही परवडेना !

By admin | Updated: August 14, 2015 21:52 IST

पदार्थांच्या दरवाढीचा ग्राहकांना फटका : दीड वर्षात साखरेचे दर घटले; पण पदार्थांचे दर ‘जैसे थे’; सामान्यांची पंचाईत

कोपर्डे हवेली : गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. साखरेचे दर कमी होत असताना साखरेपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दर तेच असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. दोन वर्षांपूर्वी साखरेला मागणी होती. त्यामुळे साखरेच्या दरात वाढ झाली. परिणामी, साखरेपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीमध्येही वाढ झाली. सध्या बाजारपेठेमध्ये साखरेचे दर पडले असताना साखरेपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दर मात्र तेच आहेत. त्यामुळे व्यापारी, विके्रते, चहा विक्रेते, मिठाई दुकानदार आदींसह इतर घटकांना त्याचा फायदा झाला. मात्र, शेतकरी आणि ग्राहकांना मात्र त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. गोड पदार्थांमध्ये ३० ते ४० टक्के साखरेचा समावेश असतो. दोन वर्षांपूर्वी काही कालावधीमध्ये ३ हजारापासून ३ हजार ७०० रूपयांपर्यंत साखरेचा क्विंटलचा दर होता. त्यापेक्षा जास्त दराने किरकोळ दुकानदार ग्राहकांना साखर विकत होते. त्यावेळी हॉटेलसह इतर मिठाईवाल्यांनी पदार्थांचे दर वाढविले होते. ३ रूपयांचा चहा ५ रूपयांना विकला जात होता. सध्या खुल्या बाजारपेठेत मिळणाऱ्या साखरेचा दर १ हजार ८०० रूपयांपासून २ हजार रूपयांपर्यंत आहे. किरकोळ दुकानदार यामध्ये वाढ करून २२ रूपये ते २३ रूपये किलोप्रमाणे साखर ग्राहकांना विकत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाचे दर कमी होऊनही त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या दरामध्ये घट झाली नाही. ज्यावेळी शेतीमालाचे दर वाढतील त्यावेळी मात्र त्यापासून तयार होणाऱ्या गोष्टींचे दर वाढविले जातात. त्यामुळे गोड खाण्याची सवय असलेल्यांना जीभेचे चोचले पुरवणे अवघड झाले आहे. (वार्ताहर) साखरेच्या दरात कायम चढ उतार राहतात. मात्र, पदार्थाचा दर कमी केला तर तो परत वाढविताना अडचणी येतात. वाढलेले दर ग्राहक सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद उद्भवतात. परिणामी, वाढलेले दर आम्हाला तसेच ठेवावे लागतात. - किरण फल्ले, व्यावसायीक, कोपर्डे हवेलीदरात सहा रूपयांची घटगत वर्षातील मार्च महिन्यापासून आजपर्यंत साखरेच्या दरात ६ रूपयांनी घट झाली आहे. मार्च २०१४ मध्ये साखरेचा किरकोळ विक्रीचा दर प्रतिकिलो ३० रूपये होता. त्यानंतर हा दर डिसेंबरअखेर तसाच राहिला. डिसेंबर २०१४ ला त्यामध्ये दोन रूपये घट होऊन दर २८ रूपये प्रतिकिलो झाला. मार्च २०१५ रोजी हाच दर २७ रूपये तर मे मध्ये २६ रूपये झाला. जुलै महिन्यात २४ रूपये दराने साखरेची विक्री केली जात होती. तर सध्या साखरेचा दर २३ रूपये प्रतिकिलो आहे. साखरेचा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.