विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वसंरक्षणाला महत्त्व द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:12 IST2021-02-18T05:12:41+5:302021-02-18T05:12:41+5:30

येथील आदर्श ज्युनिअर महाविद्यालयात वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतीमित्र अशोकराव थोरात होते. मुख्याध्यापक एस. वाय. ...

Students should value self-defense with discipline | विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वसंरक्षणाला महत्त्व द्यावे

विद्यार्थ्यांनी शिस्तीसह स्वसंरक्षणाला महत्त्व द्यावे

येथील आदर्श ज्युनिअर महाविद्यालयात वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतीमित्र अशोकराव थोरात होते. मुख्याध्यापक एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के, पर्यवेक्षक ए. एन. शिर्के, आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विभागप्रमुख एस. डी. पाटील, पोलीस नाईक प्रवीण कोळी, सचिन नाईक, वैभव निकम, जगन्नाथ कराळे, रामचंद्र राठोड व प्रमोद खाडे उपस्थित होते.

अशोकराव थोरात म्हणाले, रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यासाठी समाजात प्रबोधन करणे व ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलीस व जवान आहेत म्हणून आपण सर्वजण शांत झोप घेतो. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांना सहकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

कार्यक्रमापूर्वी मलकापूर शहरात रस्ते व वाहतूक सुरक्षा प्रबोधन फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. गाडे यांनी केले. शरद तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र राठोड यांनी आभार मानले.

- चौकट

विविध स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताह समारोपप्रसंगी विद्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, निबंध, चित्रकला, घोषवाक्य व पोस्टर प्रदर्शन स्पर्धांचा समावेश होता. त्याचवेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले.

फोटो : १७केआरडी०४

कॅप्शन : मलकापूर येथील आदर्श ज्युनिअर महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ कळके यांचे भाषण झाले.

Web Title: Students should value self-defense with discipline