Satara: कराड येथे विद्यार्थ्याने वसतीगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:16 IST2025-11-14T14:15:22+5:302025-11-14T14:16:06+5:30
एकुलत्या एक मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना बसला धक्का

Satara: कराड येथे विद्यार्थ्याने वसतीगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
कराड : कराडमध्ये एका महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने खोलीमध्ये पंख्याला गळफास घेतला. ही आत्महत्येची घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली. त्याने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप समोर आले नसून पोलिस याची चाैकशी करत आहेत.
संबंधित अल्पवयीन मुलगा महाविद्यालयाच्या आवारात असणाऱ्या वसतिगृहात राहत होता. तो नुकताच गावी गेला होता. बुधवारी रात्री वसतिगृहात तो परतला . त्याच्यासोबत खोलीत दुसरे कोणी नव्हते. मात्र, गुरुवारी सकाळी त्याने त्याच्या खोलीचे दार उघडले नसल्याने शंका आली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दार उघडले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान, याबाबत कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचा पंचनामा केला.
‘तो’ एकुलता एक
आत्महत्या केलेला अल्पवयीन मुलगा हा माण तालुक्यातील आहे. तो एकुलता एक होता. त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या घरातल्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.