शेखर जाधव --वडूज -स्पर्धेच्या युगात शिक्षण घेत असताना आपल्या पाल्याने निरोगी व आरोग्यदायी शिक्षण घ्यावे, यासाठी पालकांची भंबेरी उडत असते. मात्र वडूज बसस्थानक परिसरात काही महिन्यांपासून विद्यार्थी एसटी पास खिडकीजवळ घाणीचे साम्राज्य साठून विद्यार्थ्यांसह एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ही खिडकी एसटी पास योजनेसाठी आहे की कचराकुंडीसाठी? हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.वडूज शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या परिसरात शाळा, कॉलेज, महाविद्यालयासह शैक्षणिक इतर कोर्सचे शैक्षणिक दालन मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी तालुक्याच्या टोकापासून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एसटीचा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने पास सवलत योजना सुरू केलेली आहे. मात्र, वडूज बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंतीलगत असणाऱ्या मंडईमधून उर्वरित नासक्या पालेभाज्या या खिडकी परिसरात टाकल्या जातात. त्यामुळे या एसटी पास खिडकीजवळ कुबट वास येऊन प्रसंगी डुकरांच्या त्रासाला सामोरे जाऊन विद्यार्थ्यांना त्रास घ्यावा लागत आहे.एसटी पास विभागाकडून काही दिवसांपूर्वी वरिष्ठांकडे आले आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीच उपाययोजना झालेली दिसून येत नाही. तसेच बसस्थानक परिसरातील मुताऱ्यांची गैरसोय, शौचालयाची गैरसोय होत असतानादेखील संबंधित प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांसह पालकवर्ग आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.नवीन आगाराचे नेमके काय झाले?वडूज आगार हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने आणि सर्वच शासकीय कार्यालयासह शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालये आणि दवाखाने असल्याने तालुक्याच्या टोकावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे; मात्र, प्रारंभी नफ्यात व सुयोग्य नियोजनात असणारा वडूज आगार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे. तर सध्या असणारे बसस्थानक हे वाहतुकीच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने त्रासदायक बनले आहे. सुसज्ज जागा असून गेले कित्येक वर्षे प्रस्ताव धूळखात पडला आहे.वडूज बसस्थानक परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. त्याचबरोबरीने विद्यार्थी एसटीपास खिडकीजवळ भाजीमंडईची शिल्लक राहिलेली कुजकी व नासकी भाजी साठल्याने या परिसरात एसटीपास काढताना नाकावर रूमाल धरून काही तास ताटकळत उभे राहावे लागते. यावर तातडीने संबंधित विभागाने उपाययोजना करावी.- अक्षय जाधव एसटी पास खिडकी परिसरात नाक दाबून धरूनच पास काढावा लागतो. गेले कित्येक दिवस या परिसरातील स्वच्छता नसल्याने आमचे काही मित्र या घाणीमुळे आजारी पडले आहेत. तर बसस्थानक परिसरात अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. - शुभम गोडसे
एसटी पास खिडकी? छे छे..कचराकुंडी!
By admin | Updated: November 27, 2015 00:41 IST
विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया : वडूज बसस्थानक परिसरातील स्वच्छतेचे वाजले बारा; प्रशासनाच्या नियोजनाचेही तीन-तेरा --वडूज फोकस
एसटी पास खिडकी? छे छे..कचराकुंडी!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}