शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:57 IST

विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

ठळक मुद्देप्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौडला उत्स्फूर्त प्रतिसादविजय दिवस समारोह : विविध शाळा, संस्थांची उपस्थिती

कऱ्हाड : विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.कऱ्हाड येथील दत्त चौकातून प्लास्टिकमुक्त दौडला आमदार आनंदराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर प्रारंभ झाला. यावेळी शिक्षण मंडळ कऱ्हाडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, धनलक्ष्मी संस्थेचे दिलीप चव्हाण, सलीम मुजावर, संध्या पाटील, पौर्णिमा जाधव, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड समिती प्रमुख ए. आर. पवार, अ‍ॅॅड. परवेज सुतार, प्रा. जालिंदर काशीद, रत्नाकर शानभाग, प्रा. महालिंग मुंढेकर, चंद्र्रकांत जाधव, विलासराव जाधव यांच्यासह रोटरी, लायन्स क्लबचे पदाधिकारी, खेळाडू व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला.दत्त चौक, चावडी चौक, कन्याशाळा, उपजिल्हा रुग्णालय, विजय दिवस चौकमार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम यामार्गे रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. यामध्ये लाहोटी कन्या प्रशाला, टिळक हायस्कूल, यशवंत हायस्कूल, यशवंत हायस्कूल या तीन शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. दौडीतील विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात प्लास्टिकमुक्त कऱ्हाडची शपथ देण्यात आली. यानंतर दौडीची सांगता झाली.प्लास्टिक हटाव; बिमारी बचाओरॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी, स्वच्छतादूत, कर्मचाऱ्यांच्यावतीने प्लास्टिकमुक्तीच्या प्लास्टिक हटाव, बिमारी बचाओ आदींसह विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणा, फलकांद्वारे नागरिकांमध्ये यावेळी विद्यार्थी, पालिकेच्यावतीने प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSatara areaसातारा परिसर