शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बुध हल्लाप्रकरणी सहा जण ताब्यात

By admin | Updated: August 18, 2015 00:48 IST

दोघांना कोठडी : चौघे खारघरमध्ये जाळ्यात

पुसेगाव : बुध (करंजओढा), ता. खटाव येथील रामोशी वस्तीवर शनिवारी (दि. १५) झालेल्या सशस्त्र हल्ल्यातील ६ आरोपींना पकडण्यात पुसेगाव पोलिसांना यश मिळाले असून, अद्याप फरारी असलेल्या आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी सांगितले. महिपती अंतू जाधव व अशोक महिपती जाधव या दोन संशयितांना वडूज न्यायालयाने दि. २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर चार संशयित खारघर येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. स्वातंत्र्यदिनी झालेल्या या भीषण हल्ल्यात दोन तरुणांचा निर्घृण खून झाला होता. मृतांत दिलीप मल्हारी जाधव (वय २७), शामराव कोंडिबा जाधव (वय २६, दोघे रा. करंजओढा) यांचा समावेश आहे. शामराव यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यात आणखी पाचजण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती अद्याप चिंंताजनक आहे. जखमींवर सातारा येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील चार संशयित खारघर (मुंबई) येथील हिरानंद सर्कल भागात फिरत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. समीर मोहन जाधव, योगेश रायसिंंग जाधव, सौरभ विलास जाधव व कमलेश ज्ञानदेव जाधव अशी त्यांची नावे आहेत. शामराव कोंडिबा जाधव व संदीप बबन जाधव यांच्यासह अन्य दोघांवर यांच्या राहत्या घराजवळ ज्ञानदेव शंकर जाधव, रायसिंंग शंकर जाधव, कमलेश ज्ञानदेव जाधव, योगेश रायसिंंग जाधव, नीलेश ज्ञानदेव जाधव, विलास शंकर जाधव, सौरभ विलास जाधव, मंगेश मोहन जाधव, समीर मोहन जाधव, श्रीपती महिपती जाधव, महिपती अंतू जाधव व अशोक महिपती जाधव (सर्व रा. करंजओढा, बुध) यांनी सशस्त्र हल्ला केला होता. तलवार, कुऱ्हाड, लोखंडी पाईप, हॉकी स्टिक व काठ्यांचा वापर या हल्ल्यात करण्यात आला. हा हल्ला पूर्ववमन्यस्यातून झाला असल्याचे पुढे आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडे व सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांच्या मार्गर्दानाखाली उपनिरीक्षक उध्दव वाघ तपास करीत आहेत. (वार्ताहर) घटनास्थळी अद्याप तणाव या घटनेमुळे घटनास्थळी व बुध परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये धडक कृतिदलाची तुकडी,प् ाोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा करत आहेत. या घटनेत सुमारे १२ जणांवर गुन्हा दाखल असून, इतर १५ ते २० अनोळखी जणांचा या घटनेत आरोपी म्हणून समावेश आहे.