शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झुडपांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

कऱ्हाड : किरपे ते सुपने या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष वाढले आहेत. या वृक्षांच्या फांद्यामुळे मोठ्या ...

कऱ्हाड : किरपे ते सुपने या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष वाढले आहेत. या वृक्षांच्या फांद्यामुळे मोठ्या वाहनांचे नुकसान होत आहे. या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. मालवाहतूक वाहनांचीही ये-जा असते. मोठ्या वाहनांच्या काचांना वृक्षांच्या फांद्या थटून काचा फुटत आहेत. या धोकादायक फांद्या तसेच वृक्ष हटविण्याची मागणी होत आहे.

वानरांकडून नुकसान

तांबवे : सुपने परिसरात हंगामातील पिकांचे वानरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. तसेच गावठाणातही वानरांच्या टोळीने शिरकाव केला असून, त्यांच्याकडून घरांच्या छतांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हंगामातील पिके सध्या जोमात आली आहेत. त्यातच वानरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

एसटीची मागणी

रामापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. एसटी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांतून होत आहे. पाटण ते कोयना, पाटण ते कुसरूंड, पाटण ते चाफोली, पाटण ते मणदुरे, पाटण ते सणबुर, पाटण ते ढेबेवाडी आदी मार्गांवर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

अंधाराचे साम्राज्य

मलकापूर : मलकापूर भाजी मंडई ते कृष्णा रुग्णालय परिसरात उपमार्गावर महिलांची नेहमीच वर्दळ असते़ या परिसरात पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने अनेक वेळा अनुचित प्रकार घडतात़ हा परिसर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतो. तसेच येथे उड्डाणपूल असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. अनुचित घटना रोखण्यासाठी येथे पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़