शिवक्रांती हिंदवी सेनेकडून गतिरोधकावर पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:23+5:302021-02-25T04:53:23+5:30

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस एकीव-कुसुंबीमुरा-चिकणवाडी रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत होते. यामुळे शिवक्रांती हिंदवी ...

Shivkranti Hindavi Sena leases the roadblock | शिवक्रांती हिंदवी सेनेकडून गतिरोधकावर पट्टे

शिवक्रांती हिंदवी सेनेकडून गतिरोधकावर पट्टे

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस एकीव-कुसुंबीमुरा-चिकणवाडी रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत होते. यामुळे शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निरपेक्ष भावनेतून या आठ ते दहा किलोमीटर परिसरातील गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पारंबे फाट्यापासून उजवीकडे एकीव-कुसुंबीमुरा-चिकणवाडी या मार्गावर मागील काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले आहे. दरम्यान, या मार्गावर असणाऱ्या गतिरोधकांचा अंदाज यावा व अपघात टळावा यासाठी शिवक्रांती हिंदवी सेनेकडून एकीव येथे तीन ठिकाणी, मोळेश्वर येथे दोन ठिकाणी, कुसुंबीमुरा येथे सहा ठिकाणी, तर चिकणवाडी येथे तीन ठिकाणी पांढरे पट्टे मारून रंगकाम करण्यात येत आहे.

शिवक्रांती हिंदवी सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल धनावडे, खजिनदार सुधीर कांबळे, जावळी तालुका अध्यक्ष शिवाजी गोरे, नवनाथ कोकरे, सुमित कांबळे, अनिकेत जाधव, महेश कोकरे, जगन्नाथ शिंदे, संतोष गोरे, संकेत कोकरे, अंकुश कोकरे, समीर कोकरे, सूरज कोकरे यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.

Web Title: Shivkranti Hindavi Sena leases the roadblock