शरद पवारांचा २८ डिसेंबरला साताऱ्यात नागरी सत्कार

By Admin | Updated: November 25, 2015 00:38 IST2015-11-24T23:53:21+5:302015-11-25T00:38:09+5:30

अमृत महोत्सवी सोहळा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निमंत्रण

Sharad Pawar's felicitation in Satara on 28th December | शरद पवारांचा २८ डिसेंबरला साताऱ्यात नागरी सत्कार

शरद पवारांचा २८ डिसेंबरला साताऱ्यात नागरी सत्कार

कऱ्हाड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा अमृत महोत्सव राज्यभर साजरा होत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील राष्ट्रवादीतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा सोमवार, दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता सातारा येथे घेण्याचे नियोजन केले असून, माजी मंत्री शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निमंत्रण शरद पवार यांना कऱ्हाड येथील विश्रामगृह येथे दिले. त्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याने या कार्यक्रमाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.मंगळवारी दुपारी कऱ्हाड येथील विश्राम गृह येथे विश्रांतीसाठी आले असता. त्यांची राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यावेळी सदरचे निमंत्रण त्यांना दिले. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार प्रभाकर घार्गे, राजेश पाटील वाठारकर उपस्थित होते.शरद पवार यांनी कऱ्हाड येथील विश्रामगृहावर दुपारचे जेवण घेतले व त्यानंतर सांगली जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमाकडे ते रवाना झाले. दरम्यान झालेल्या चर्चेत शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवासादिवशी पाटण येथेही शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला आहे. पाटण बाजार समिती व पाटण अर्बन बॅकेचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार होणार आहे. (प्रतिनिधी)


सातारा जिल्हा बँकेतर्फे शरद अमृतवर्ष’ पुरस्कार
सातारा : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जिल्ह्णातील कृषी, सहकार, महिला सबलीकरण. औद्योगिक, साहित्यीक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल संस्था व व्यक्तिंना ‘शरद अमृतवर्ष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्णाच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहीनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उत्कर्षाचा आलेख कायम चढता ठेवला आहे. नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्काराने गौरविले आहे. बँकिंग सेवा क्षेत्रातील ‘आयएसओ ९००१:२००८’ हे मानांकन तसेच लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्येही सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणून नोंद झाली आहे. बँकेतर्फे आयोजित केला जाणारा गौरव सोहळा बुधवार, दि. २४ रोजी बँकेच्या नवीन इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, व मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एफ. धरू यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sharad Pawar's felicitation in Satara on 28th December