शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जकातवाडीतील जलशुद्धीकरण केंद्र गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून वितरण होणाऱ्या जलवाहिनीला बोगदा परिसरात लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच पालिकेच्या ...

सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून वितरण होणाऱ्या जलवाहिनीला बोगदा परिसरात लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जकातवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र गाळमुक्त करण्याचे काम हाती घेतले आहे. पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी या कामाची पाहणी करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

जकातवाडी (ता. सातारा) येथील शुद्धीकरण केंद्रातून सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी या टाकीची स्वच्छता करण्यात येते. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच रविवारी बोगदा परिसरात असणाऱ्या शहापूर पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली. ही गळती काढण्याचे काम पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, हे काम मार्गी लावत असतानाच पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे, अभियंता सुधीर चव्हाण, दिग्विजय घाडगे, रत्नाकर वडई, सुपरवायझर संदीप सावंत, महेश माने हे कर्मचाऱ्यांसह जकातवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर दाखल झाले. यानंतर पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. बोगदा परिसरातील गळती काढण्याचे काम सुरू असतानाच जलशुद्धीकरण केद्राची स्वच्छता करण्यात आली. अन्यथा केवळ या कामासाठी पाणी पुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागला असता. भविष्यातही नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि सर्व सभापती, नगरसेवक यांच्या सहकार्याने पाणी पुरवठा विभागाचा आलेख उंचावत राहू, अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी दिली.

फोटो : ०२ जकातवाडी

सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जकातवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. या कामाची सभापती सीता हादगे यांनी पाहणी केली.