शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा संगणकात; शेतकरी बुचकळ्यात!

By admin | Updated: November 26, 2015 00:01 IST

महसूल विभागाचे काम ठप्प : लिखित सातबारा बंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल

पांडुरंग भिलारे ल्ल वाईवाई तहसीलदारांनी महसूल विभागाच्या लेखी सातबारा उतारे न स्वीकारण्याचा आदेश सर्व मंडलाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशामुळे लेखी महसूल विभागातर्फे लेखी उतारे स्वीकारले जात नाहीत़ सर्व रेकॉर्ड आॅनलाईन करण्याचे कामकाज सुरू आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे व खरेदीविक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना मोठा मन:स्ताप होऊन व्यवहार ठप्प झाल्याने मोठ्या नुकसानीस सामोरे जावे जागत आहे़ तसेच या निर्णयामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून, याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे़ दरम्यान, तहसीलदारांच्या सहीनिशी काढण्यात आलेल्या पत्रामध्ये अशा प्रकारे तलाठ्यांना आदेश देण्यात आले आहेत़ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्याकडील संदर्भीय आदेशान्वये वाई तालुक्यात आॅनलाईन ई-अज्ञावलीची अंमलबजावणी दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून करण्याची आहे. यास्तव दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून हस्तलिखित साताबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवहीमधील हस्तलिखित कामकाज बंद करण्याचे आहे, तरी आपल्या मंडलातील सर्व सजांतील सर्व तलाठी यांच्याकडील हस्तलिखित सातबारा फेरफार व ७ अ नोंंद वही रितसर या कार्यालयात जमा करण्याच्या आहेत. तसेच हस्तलिखित सातबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही याचे हस्तलिखित वितरण दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून पूर्णपणे बंद करण्याचे असल्याने दि़ २२ आॅक्टोबर १५ रोजी सायंकाळी सर्व कामगार तलाठी यांच्याकडील वर नमूद केलेले सातबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही या कार्यालयामध्ये बिनचूक जमा करण्याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारे आदेश काढण्यात आले आहेत़ मुळात सातबारा व ८ अ रेकॉर्डचे संगणकीकरण हे सदोष झाल्याने आॅनलाईन अनेक उतारे दिसत नाही़ बरेच रेकॉर्ड अपूर्ण आहे़ त्यामुळे तलाठ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ मात्र निर्णयामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे़ आणि आॅनलाईन सातबारा, ८ अ मधील त्रुटी आणखी किती दिवस दूर होतील, हे सांगता येत नाही़ वास्तविक पाहता आॅनलाईन रेकॉर्ड अद्ययावत करून तलाठ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व नोंदणीविषयी स्पष्टता असावी, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले़शासनाचे मोठे आर्थिक नुकसान... वाई महसूल विभागात दररोज १५ ते २० व्यवहार होत असतात यापासून ७९ ते ८० हजारांचा महसूल स्टॅम्प ड्यूटीच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो़ तो महसूल बुडत असल्याने शासनाचे मोठे नुकसान होत आहे़

आॅनलाईन रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आहेत, येत्या आठ दिवसांत त्या दूर करून आॅनलाईन उतारे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत़ तलाठ्यांना आॅनलाईनचे प्रशिक्षण चालू केले आहे़ - सदाशिव पडदुणे, तहसीलदार वाई आॅनलाईनची सुविधा न करताच लेखी उतारे बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप होत आहे़ तसेच कामांचा खोळंबा होत आहे तरी शासनाने यावर त्वरित तोडगा काढून यंत्रणा सुरळीत करावी़ - राघू बापू सणस, शेतकरीशेकडो व्यवहार झाले ठप्पवाई महसूल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात. अनेकांनी साठेखत करून तर कोणी ‘टोकन’ देवून जागा खरेदीच्या व्यवहाराला सुरूवात केली आहे, पण सातबारा मिळत नसल्याने हे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.