नरसिंह हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:38+5:302021-01-08T06:05:38+5:30

वाई : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या धोक हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक दत्ता ...

Savitribai Phule Jayanti at Narasimha High School | नरसिंह हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती

नरसिंह हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती

वाई : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या धोक हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक दत्ता देसाई यांच्यासह मान्यवर व विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले विचार मांडले. माहिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडून साक्षरतेचा वारसा घेऊन आपले जीवन स्वावलंबी बनवावे, असे आवाहन कृष्णा कांबळे यांनी केले. यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी कविता गायन केले.

यावेळी वैभव देसाई, शिवाजी सुरवसे, संतोष पाटोळे, वैभव जाधव, नाना चिंचकर, उत्तम झांजुर्णे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय महांगडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Savitribai Phule Jayanti at Narasimha High School