शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वॉटर कप स्पर्धा : राज्यातील ४९०० गावांत तुफान येणार...४५ तालुके अन् २४ जिल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:07 IST

वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देवॉटर कप : राज्यातील ४९०० गावांत तुफान येणार...४५ तालुके अन् २४ जिल्हे स्पर्धेत सहभागी  वॉटर कप स्पर्धेमध्ये यावर्षी सहभाग वाढला; साताऱ्यातील १६३ गावांचा सहभाग

सातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत.तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी झाले होते.

यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता. कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३०तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

सातारा जिल्ह्याने दुसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता.

जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यामध्ये डीपसीसीटी, ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण, सीसीटी, वृक्षारोपणासाठी खड्डे, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण, बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, गळती काढणे, नवीन नालाबांध तयार करणे आदी कामांचा समावेश होता.वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू होत आहे. हे काम ४५ दिवस चालणार असून, दि. २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके उतरले आहेत. यामध्ये ४९०० गावांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातही यावर्षी गतवर्षीप्रमाणेच माण, खटाव आणि कोरेगाव हे तालुके आहेत; पण यावर्षी स्पर्धेतील गावांची संख्या वाढली असून, ती १६३ इतकी झाली आहे. त्यामध्ये माण तालुका ६६, खटाव ५७ आणिकोरेगाव तालुक्यातील ४० गावांचा समावेश आहे.

सध्या वॉटर कपमध्ये सहभागी झालेल्या गावांत जनजागृती, ग्रामसभा घेण्याचे काम सुरू आहे. पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ शिवारफेरी करीत आहेत. त्यातून कामाचे नियोजन करण्यात येत आहे. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर