पाणी फाउंडेशन स्पर्धेत नायगाव सहभागी

By admin | Published: March 27, 2017 02:17 AM2017-03-27T02:17:06+5:302017-03-27T02:17:06+5:30

सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप

Nayagaon participants in the Water Foundation competition | पाणी फाउंडेशन स्पर्धेत नायगाव सहभागी

पाणी फाउंडेशन स्पर्धेत नायगाव सहभागी

Next

जेजुरी : सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नायगाव (ता. पुरंदर) या गावानेही सहभाग घेतला आहे.
पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले असून, पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी गाव दुष्काळमुक्तीसाठी राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल. यावेळी रघुनाथ जगताप, शंकर शिंदे, उदय नाकती यांनीही ग्रामस्थांना पाणी अडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीला पाणी फाउंडेशनचे सुधीर सांगारे, एल. ए. पठाण, अक्षय बनकर, तसेच सिद्धेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रदीप खेसे, नायगाव सोसायटीचे चेअरमन मल्हारी कड, उपसरपंच सविता खेसे, सदस्या मंदाकिनी कड, ग्रामसेवक बी. आर. कांबळे, तसेच चंद्रकांत कड, परशुराम खेसे, विठ्ठल कड, शांताराम कड, अनिल खेसे, प्रवीण जगताप, विलास चौंडकर, आदीनाथ भागवत, माऊली सोनवणे, विद्या कड, शीतल खेसे, आदी उपस्थित होते.

यासंदर्भात, नायगाव येथे गावबैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी सहभाग नोंदवला असून, यावेळी ग्रामस्थांना दुष्काळाच्या फिल्म दाखवण्यात आली. त्याच बरोबर पाणी फाउंडेशनचे पुरंदर तालुका समन्यवयक सुरेश सस्ते यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Web Title: Nayagaon participants in the Water Foundation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.