Satara: शिक्षकाचा विद्यार्थिनीवर जडला जीव, व्हॅलेंटाईन डेला केलं प्रपोज; म्हणाला,""रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:23 IST2026-02-16T15:22:01+5:302026-02-16T15:23:23+5:30
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गातून बाहेर बोलावलं आणि तिचा बळजबरी हात धरत प्रपोज केलं. या प्रकाराने विद्यार्थिनी घाबरली आणि वर्गात गेली. आईवडिलांना तिने ही याबद्दल सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Satara: शिक्षकाचा विद्यार्थिनीवर जडला जीव, व्हॅलेंटाईन डेला केलं प्रपोज; म्हणाला,""रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर..."
सातारा जिल्ह्यात एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीला प्रपोज केल्याची घटना घडली. व्हॅलेटाईंनच्या दिवशी शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गातून बोलावून घेतले. तिचा हात पकडला आणि मी तुझ्या प्रेम करतो असे म्हणत काही गोष्टी विचारल्या. घाबरलेली विद्यार्थिनी तिथून पळून गेली. आईवडिलांना तिने याबद्दल सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असलेल्या मलकापूरमध्ये ही घटना घडली आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज करत विनयभंग केला. या प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत काय केले?
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिक्षकाने वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीला बाहेर बोलावले. विद्यार्थिनी घाबरतच वर्गाबाहेर गेली. तिच्यासोबत तिच्या तीन मैत्रिणींनाही तिने नेले होते.
विद्यार्थिनी सोबत असलेल्या तिच्या तीन मैत्रिणींना शिक्षकाने वर्गात पाठवलं. त्यानंतर विद्यार्थिनीला थांबवले आणि म्हणाला की, "मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सअपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो", असे म्हणत तिचा हात पकडला.
हे ऐकून विद्यार्थिनी घाबरली. तिने हात झटकला आणि पळत वर्गात गेली. त्यानंतर तिने तिच्या मैत्रिणींना ही घटना सांगितली. तिने कुटुंबायांनाही झालेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी कराड पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.