शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

साता-यातील नगरसेवक बाळू खंदारेला मोक्का, पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 6:35 PM

खंडणी, खासगी सावकारी अन् मारामारीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक बाळू खंदारे याला मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सातारा : खंडणी, खासगी सावकारी अन् मारामारीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक बाळू खंदारे याला मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे (वय २८, रा. मल्हार पेठ, सातारा) याच्या नावावर दहाहून अधिक विविध गुन्हे दाखल आहेत. खासगी सावकार खंड्या धाराशिवकर याच्या टोळीच्या मदतीने बाळू खंदारेने पैसे उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच उद्योजकांना खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी, मारामारी असे गुन्हे त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अलीकडे सुरुचि राडाप्रकरणात त्याला अटक झाली आहे. सध्या तो या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.दरम्यान, बाळू खंदारे अल्पवयीन असल्यापासून त्याच्यावर मारामारी, दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल होते. ज्या दिवशी त्याला अठरा वर्षे पूर्ण झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस सांगतायत. त्यावेळचा एक किस्सा पोलिसांच्या अद्यापही स्मरणात आहे. रविवार पेठेमध्ये दोन गटांत मारामारी झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दहशत माजविण्यात आली होती. त्यावेळचे शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शिंदे यांनी बाळू खंदारेला बदडतच भर रस्त्यातून पोलीस ठाण्यात आणले होते.खंदारेला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो राजकारणात सक्रिय झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून पहिल्याच प्रयत्नात तो नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून आला. तीन ते चार सभांना तो पालिकेत हजर राहिला असेल, अन्यथा इतर सर्व दिवस त्याचे पोलिसांपासून लपण्यातच गेले. आता तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारची कारवाई झालेला सातारा पालिकेच्या इतिहासातील बहुदा हा पहिलाच नगरसेवक असेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा