शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

‘सातारा घनसाळ’ तांदळाचा ब्रँड विकसित

By admin | Updated: January 10, 2015 00:13 IST

शेतीतला प्रयोग : करंजे तर्फ परळी परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

परळी : ग्राहकांची मागणी असूनही घनसाळ तांदूळ उपलब्ध होत नाही. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील करंजे तर्फ परळीसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी कृषिक्रांती शेतकरी स्वयंसहाय्यता शेतकरी गटाच्या साह्याने भाताच्या घनसाळ जातीची लागवड केली. या शेतकारी गटाने विक्रीसाठी ‘सातारा घनसाळ’ हा तांदळाचा ब्रँड विकसित केला आहे.
शहरापासून १७ किलोमीटरवर उरमोडी धरणाच्या कुशीत वसलेले करंजे तर्फ परळी हे निसर्गरम्य गाव. येथील शेतकरी खरिपात भाताच्या पारंपरिक जातींची लागवड करतात. त्यामुळे हाती येणारे भाताचे जेमतेम उत्पादन काळाची गरज ओळखून या गावातील शेतकऱ्यांनी परिस्थिती बदलण्याचे ठरविले. अन् येथील शेतात घनसाळचा सुवास दरवळू लागला. घनसाळ भाताचे दर्जेदार उत्पादन आणि चांगल्या दरामुळे भात शेतीतून शेतकऱ्यांचा आर्थिक नफा वाढला.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने भाताच्या घनसाळ या जातीची लागवड करतात. सुंदर सुवास आणि अप्रतिम चव यामुळे या तांदळाला चांगली मागणी असते. मात्र, बाजारात ग्राहकांची मागणी असूनही घनसाळ तांदूळ उपलब्ध होत नाही. ही मागणी लक्षात घेऊन करंजेसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी ‘कृषिक्रांती’ गटाच्या मदतीने भाताच्या घनसाळ जातीची लागवड करून ‘सातारा घनसाळ’ हा नवा ब्रँड विकसित केला.
या गावाच्या परिसरातील शेतकरी भाताच्या इंद्रायणी, बासमती, सह्याद्री, रत्नागिरी - २४ त्याचबरोबर काळी कुसळी या पारंपरिक जातीची लागवड करतात. मात्र, तांदळाची विक्री करताना अडचणी या शेतकऱ्यांपुढे होत्या. ‘आत्मा’चे संचालक गणेश घोरपडे यांना कृषिक्रांतीचे अध्यक्ष मोहन लाड यांनी भाताच्या जाती, उत्पादन व विक्री संदर्भातील अडचणी सांगितल्या. (वार्ताहर)


साताऱ्यात ‘तांदूळ महोत्सव’ सुरू करणार
सातारा जिल्हा ‘पॅटर्न जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याच्या हक्काच्या तांदूळ उत्पादनाला चांगला दर मिळावा म्हणून कृती विभागाने ‘तांदूळ महोत्सव’ सुरू केला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हा तांदूळ महोत्सव बंद झाला आहे. महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.