सातारा शहर पोलिसांचे जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST2021-03-04T05:12:02+5:302021-03-04T05:12:02+5:30

सातारा : सातारा शहरातील विविध ठिकाणच्या तीन जुगार अड्ड्यांवर सातारा शहर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. यामध्ये रोख रकमेसह ...

Satara city police raids gambling dens | सातारा शहर पोलिसांचे जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा शहर पोलिसांचे जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा : सातारा शहरातील विविध ठिकाणच्या तीन जुगार अड्ड्यांवर सातारा शहर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. यामध्ये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सदर बझारमधील लक्ष्मीटेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी ७९० रुपयांची रोखड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. तर सनी बाबूलाल भंडारी (वय ३०) आणि अरुण माने (दोघेही रा. लक्ष्मीटेकडी, सातारा) यांना अटक केली. सातारा शहरालगत असणाऱ्या कोडोली गावच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ८५० रुपयांची रोखड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी राहुल मुनीश्वर अवघडे (वय ३०, रा. धनगरवाडी, सातारा) आणि समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गोडोलीतील एका हॉटेलच्या पाठीमागील जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी सचिन कृष्णा देशमुख (वय ३५, मूळ रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव. सध्या रा. साळुंखे कॉलनी, गोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी रोखड आणि जुगाराचे साहित्यही जप्त केले आहे.

.................................................

Web Title: Satara city police raids gambling dens