शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:35 IST

विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा प्रकारची आर्जव केली होती.

सातारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या मनातून राष्ट्रवादी काँग्रेस बाबतचे प्रेम कमी झालेले नाही.

विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा प्रकारची आर्जव केली होती. आज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट राजकीय भेट होती की शहरातील सर्वसामान्य प्रश्नांसंदर्भात भेट होती याबद्दल साताऱ्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

 शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपण शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही कधीही विकास कामांबाबत अडथळा आणत नाहीत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शहरातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न त्याबरोबरच एमआयडीसी, अर्धवट राहिलेलं कास धरणाचे काम आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात निवेदन हे अजित पवार त्यांनी दिले असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले. मात्र, दरम्यानच्या काळात अजित पवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली असू शकते हे देखील नाकारता येत नाही. 

सातारा का महत्वाचे? 

महाराष्ट्र राज्यासाठी सातारा खूप महत्वाचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्राचे राजकीय केंद्र सातारा ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतात. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना उमेदवारी दिली जाते. मात्र, लोकसभेला जिंकलेल्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. यानंतर विधानसभेच्या तोंडावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीदेखील राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. दोन्ही निवडणुका एकाचवेळी झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्व ताकद पणाला लावत उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. तर शिवेंद्रसिंह राजे निवडून आले होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले