पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:06 PM2020-06-27T13:06:35+5:302020-06-27T13:08:18+5:30

सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sharad Pawar reacted on MLC gopichand padalkar for controversial statement | पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

Next

सातारा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीने यावर राज्यभर आंदोलने केली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शरद पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शद्बांत टीका केली. मला नाही वाटत त्याला काही महत्व द्यावे. लोकसभेला, विधानसभेला ज्या व्यक्तीचे डिपॉझिट जप्त झाले त्या बद्दल काय बोलणार. त्याला लोकांनीच त्या त्या वेळेला बाजुला केले आहे. त्याची नोंद का घ्यावी, सोडून द्या, अशी शेलक्या शब्दांतील टीका शरद पवार यांनी केली. 


चीनसोबत युद्ध होणार नाही असे म्हणणे योग्य नाही. चीनने कुरापत काढली. सियाचिनच्या आपल्या भागात जाण्यासाठी हा रस्ता केलेला आहे. हा रस्ता भारतीयांसाठी आहे. असे असताना चीनचे सैन्य त्या रस्त्यावर येते. तेव्हा आपल्या जवानांनी त्यांना अडविले. झटापट झाली. 1993 साली संरक्षण मंत्री असताना चीनमध्ये गेलो होतो. तेव्हा हिमायलीन सीमेवर सैन्य़ कमी करण्याची चर्चा केली होती. नरसिंहराव यांनी चीनसोबत करार केला. यामध्ये दोन्ही बाजुने गोळीबार होणार नाही असा शब्द देण्यात आला. यामुळे चीनच्या बाजुने शारिरिक इजा करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जवान गस्त घालत होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 


चीनने काही भाग बळकावला आहे हे खरे आहे. चीनच्या युद्धानंतर चीनने हजारो किमी भूभाग ताब्यात ठेवलेला आहे. ती अजून काय सोडलेली नाही. आजच्या परिस्थितीबाबत माहिती नाही. आरोप करत तेव्हा आपण असताना काय घडले होते तेही पाहिले पाहिजे. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. यावर राजकारण करू नये असे माझे मत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करतात या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

पडळकर काय म्हणाले होते? 

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

Web Title: Sharad Pawar reacted on MLC gopichand padalkar for controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.