CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:15 PM2020-06-26T15:15:23+5:302020-06-26T15:19:06+5:30

काशीच्या हिंदू विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद विभागाने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे हे औषध 40 वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले होते, असे या विश्वविद्यालयाचे म्हणणे आहे.

Ayush mantralay gives permission for test BHU Ayurveda medicine on corona virus patient | CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

googlenewsNext

वाराणसी : योग गुरु रामदेव बाबा यांनी प्रतिकारशक्तीवरील औषध बनविण्याची परवानगी घेऊन कोरोनावर 100 टक्के मात करणारे औषध लाँच केल्याने देशात मोठी खळबळ उडाली होती. भल्या भल्या कंपन्यांना तीन चार प्रकारच्या ट्रायलमधून जावे लागत असताना रामदेव बाबांनी कोणतीही अधिकृत चाचणी न घेता थेट औषध लाँच करत दावा केल्याने आयुष मंत्रालयालाही ही बाब खटकली होती. आता काशी विश्वविद्यालयाने मोठा दावा केला आहे. 


काशीच्या हिंदू विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद विभागाने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे हे औषध 40 वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले होते, असे या विश्वविद्यालयाचे म्हणणे आहे. आयुष मंत्रालयाने बीएचयुच्या या आयुर्वेद विभागाच्या दाव्यावर विश्वास ठेवून औषधाच्या चाचणीला परवानगी दिली आहे. चाचणीच्या तीन महिन्यांनंतर बीएचयू आयुर्वेद विभाग अहवाल आयुष मंत्रालयाकडे सोपविणार आहे. 


बीएचयुच्या आयुर्वेद विभागाचे डीन डॉ. यामिनी भूषण त्रिपाठी यांनी सांगितले की, 22 मार्चला आम्ही आयुष मंत्रालयाला पत्र लिहिले होते. 1980 मध्ये श्वसनरोगासाठी शोधलेले औषध 'शिरीषादि कसाय' च्या चाचणीला मंजुरी मागितली होती. आयुष मंत्रालयाने आता मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच या औषधाची चाचणी केली जाणार आहे. आयुष मंत्रालयाने यासाठी 10 लाख रुपयांची मदतही देऊ केली आहे. बीएचयूच्या कोविड रुग्णालयामध्ये याची चाचणी केली जाईल. कोरोनाचे आणि श्वसनरोगाचे सारखेच लक्षण आहेत. यामुळे हे औषध कोरोनावर रामबाण उपाय ठरू शकते. 


काय आहे 'शिरीषादि कसाय'?
बीएचयू आयुर्वेदचे माजी प्राध्यापक एस एन त्रिपाठी यांनी हे औषध शोधले होते. लाजरी, अडुळसा, ज्येष्ठमध, तेजपत्ता आणि कंडकारीच्या रसापासून हे 'शिरीषादि कसाय' औषध बनविण्यात आले होते.


रामदेव बाबांच्या कोरोनिलमध्ये काय?
कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे.अश्वगंधातील कोविड -१९ चे रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन (आरबीडी) शरीराच्या अँजिओटेन्सीन-कन्व्हर्टींग एंजाइमला (एसीई) मिळू देत नाही. म्हणजेच कोरोना मानवी शरीराच्या आरोग्य पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याच वेळी, गिलोग कोरोना संक्रमणास प्रतिबंध करते. तुळसी कोविड -१९ च्या आरएनएवर हल्ला करते आणि त्याचे वाढण्यास प्रतिबंध करते.

अन्य महत्वाच्या बातम्या...

OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात

मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

Web Title: Ayush mantralay gives permission for test BHU Ayurveda medicine on corona virus patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.