शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामसभेत मारहाण

By admin | Updated: February 6, 2015 00:43 IST

गोटेतील घटना : तहकूब सभेत नवीन विषय घेण्यावरून वाद

कऱ्हाड : गोटे, ता. कऱ्हाड येथे आयोजित ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकांना मारहाण करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत मुनीर रज्जाक सय्यद (रा. गोटे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक जगन्नाथ गंगाराम साळुंखे (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) व सरपंच रशिद इसाक आगा (रा. गोटे) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटे येथे प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यावेळी कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. तसेच ही तहकूब सभा पुढे ५ जानेवारी रोजी घेण्याचे ठरले. त्यानुसार आज (गुरुवारी) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रशिद आगा होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सभेला सुरुवात झाली. त्यावेळी ग्रामसेवक जगन्नाथ साळुंखे यांनी नियमाप्रमाणे तहकूब सभेतील विषयांव्यतिरिक्त इतर विषय या सभेत घेता येणार नसल्याचे सांगून प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुनीर सय्यद जागेवरच उठून उभा राहिला. ‘माझा विषय पहिला घेण्यात यावा,’ अशी त्याने मागणी केली. मात्र, ग्रामसेवक साळुंखे यांनी तसे करता येणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी मुनीर सय्यद याने ग्रामसेवक साळुंखे यांच्याकडे धाव घेत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. टेबलवरील कागदपत्रेही त्याने विस्कटून दिली. या धक्काबुक्कीत खुर्चीवरून खाली कोसळून ग्रामसेवक साळुंखे जखमी झाले. हा प्रकार सुरू असताना सरपंच रशिद आगा भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी मुनीर सय्यद याने त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यामध्ये सरपंच आगा यांच्या पायाला जखम झाली. याबाबत ग्रामसेवक जगन्नाथ साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुनीर सय्यद याच्यावर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शुक्रवारी धरणे आंदोलनगोटे गावच्या ग्रामसभेत घडलेली घटना निषेधार्ह असून, दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समितीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही युनियनने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.