झाडे तोडू नका म्हटल्याने सरपंचांना बेदम मारहाण; साताऱ्यात दहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:24 IST2026-01-27T14:24:19+5:302026-01-27T14:24:46+5:30

सातारा : रस्त्यालगत असलेली झाडे तोडू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर (वय ४८, रा. ओझरे, ता. ...

Sarpanch beaten up for saying not to cut trees along the road in Satara Case registered against ten people | झाडे तोडू नका म्हटल्याने सरपंचांना बेदम मारहाण; साताऱ्यात दहा जणांवर गुन्हा दाखल

संग्रहित छाया

सातारा : रस्त्यालगत असलेली झाडे तोडू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर (वय ४८, रा. ओझरे, ता. जावळी) यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २३ रोजी सकाळी दहा वाजता घडली.

तुकाराम लकडे, वैभव लकडे, शिवाजी लकडे, स्वप्नील लकडे, सुरेश लकडे, गणेश, ओंकार लकडे (सर्व रा. ओझरे, ता. जावळी) यांच्यासह दहा जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. सरपंच अजित मर्ढेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ओझरे गावच्या हद्दीतील रस्त्याच्याकडेला असलेली झाडे काहीजण तोडत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर मी गावातील काही लोकांना सोबत घेऊन तेथे गेलो.

या जागेमध्ये असलेल्या रस्त्याची केस कोर्टात चालू आहे. तुम्ही रस्त्यालगतची झाडे तोडू नका, असे म्हणालो. या कारणावरून संशयितांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर काहींनी डोक्यात दगड, काठी मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ, दमदाटीही केली. सोबत असलेल्या लोकांनाही हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.

Web Title : सतारा: पेड़ काटने से रोकने पर सरपंच की पिटाई; दस पर मामला दर्ज

Web Summary : सतारा में अवैध पेड़ कटाई का विरोध करने पर सरपंच अजित मर्ढेकर के साथ बेरहमी से मारपीट की गई। मेधा पुलिस ने दस लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। मर्ढेकर और अन्य पर पत्थरों और लाठियों से हमला किया गया क्योंकि उन्होंने उन्हें बताया था कि सड़क का मामला अदालत में है।

Web Title : Satara: Sarpanch Beaten for Stopping Tree Cutting; Ten Booked

Web Summary : Sarpanch Ajit Mardhekar was brutally assaulted in Satara for objecting to illegal tree cutting. Ten individuals have been booked by Medha police following the incident where Mardhekar and others were attacked with stones and sticks after he told them the road case was in court.