शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

संतोषला पाहिलं की लोक म्हणायचे ‘आला काळा नाग’!

By admin | Updated: August 20, 2016 22:53 IST

कर्मचारी लागले बोलू : शासकीय कार्यालयांमध्येही निर्माण केली होती दहशत

मुराद पटेल -- शिरवळ --पापाचा घडा भरला की, सगळं बाहेर पडतं. वाईच्या संतोष पोळच्या बाबतीतही हेच घडलंय. लाचलुचपतची भीती दाखवून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारा संतोषला पाहिलं की, ‘आला काळा नाग’ अशी प्रतिक्रिया बाहेर पडत होती. शासकीय कर्मचारी आता त्यांच्या भावना बोलून दाखवू लागले आहेत.संतोष पोळचे रोज नवे कारनामे उघडकीस येत असतानाच दहशतीच्या किश्शांना हॉटेल, कार्यालयांमधून वाचा फुटत आहे. मंगल जेधे खूनप्रकरणी पोळ याच्यासह ज्योती मांढरे हिच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे तपासामध्ये उघडकीस येऊ लागल्या आहेत. संतोषने सहा खुनांच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर खळबळ उडाली होती.या प्रकरणानंतर संतोषच्या अनेक कारनाम्यांचे व दहशतीचे प्रकरण उघडकीस येऊ लागले आहेत. संतोष पोळ सहकाऱ्याचा वापर करून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते विविध विभागांतील कर्मचाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करत होता. यासाठी तो कोणत्याही स्तराला जात होता. त्यामुळे गुन्हा दाखल न करण्यासाठी बाहेर आर्थिक तडजोडी करण्याऐवढी दहशत संतोषने तयार केली होती. त्यामुळेच तो एखाद्या शासकीय कार्यालयात आला तर ‘आला विषारी नाग,’ अशी प्रतिक्रिया उपस्थित अधिकारी व कर्मचारी वगार्तून उमटत होत्या. तो जेवढा वेळ कार्यालयामध्ये असेल तेवढा वेळ शासकीय अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली व तणावाखाली वावरत असत.