शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात धावपटू सुफिया यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST

दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली अशा ६ हजार किलोमीटरच्या सद्भावना दौडदरम्यान त्यांचे कऱ्हाड शहरात आगमन झाले. त्यावेळी कऱ्हाड ...

दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली अशा ६ हजार किलोमीटरच्या सद्भावना दौडदरम्यान त्यांचे कऱ्हाड शहरात आगमन झाले. त्यावेळी कऱ्हाड जिमखाना संस्थेच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, सचिव सुधीर एकांडे, विवेक ढापरे, सुचिता शहा, विवेक कुंभार, सचिन गरुड, प्रमोद गरगटे, अभिजित घाटगे, दीपक शहा, शंकर चव्हाण, डॉ. चिन्मय विंगकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी विवेक ढापरे यांनी जिमखान्याच्या कार्याचा परिचय करून दिला. रणजी सामने, संगीत महोत्सव, मराठी साहित्य संमेलन, बॅडमिंटन, टेबल टेनिस मॅचेस इत्यादी अनेक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. सुफिया यांनी यापूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी, इंडिया गेट दिल्ली ते गेट वे ऑफ इंडिया, दिल्ली - आग्रा - जयपूर - दिल्ली अशा दौड विक्रमी वेळेत पूर्ण करून अनेक विक्रम गिनीज बुकमध्ये प्रस्थापित केले आहेत.

सध्याची दौड त्या रोज ५५ किलोमीटर अंतर धावून १३५ दिवसात पूर्ण करणार आहेत. सायकलपटू असलेले त्यांचे पती विकास या दौडीचे नियोजन त्यांच्या सोबतीने करत आहेत.

डॉ. चिन्मय विंगकर यांनी प्रास्ताविक केले. अभिजित घाटगे यांनी आभार मानले.

फोटो : २३केआरडी०४

कॅप्शन : कऱ्हाड येथे जिमखाना संस्थेच्यावतीने विख्यात धावपटू सुफिया यांचा संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.