शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

रोपं करपली... मनं चरकली!

By admin | Updated: June 30, 2014 23:56 IST

जावलीकर चिंतेत : एकुलत्या एका हंगामात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

दत्ता पवार ल्ल कुडाळसंपूर्ण जिल्ह्यात जावली तालुका हा अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने थोडीफार हजेरी लावली. या धुळवाफेतच शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता पिकांनी डोकं वर काढलेले असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षातून एकच पीक घेता येत असल्यामुळे हा हंगाम महत्त्वाचा असतो. मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांवर वेळेत पाऊस न झाल्याने दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावले आहे.तालुक्यात आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. मार्चपासून तालुक्यातील काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन गावांना टँकर सुरू करावे लागले आहेत. दरवर्षी हे टँकर जूनपर्यंतच सुरू राहतात. मात्र, यावर्षी पावसाने दडी मारल्याने जून महिना संपला तरीही तालुक्यात ८ टँकरद्वारे १९ गावे ९ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. आता तर हे टँकर भरण्याइतकीही तालुक्यातील विहिरींची पाणीपातळी उरली नसल्याने सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील विहिरीतून टँकर भरावे लागत आहेत, एवढी भीषण स्थिती निर्माण झाली आहे.दोन-दोन मोठी धरणे तालुक्यात असूनही तालुक्यातील १० टक्के क्षेत्रदेखील ओलिताखाली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडून आजही पारंपरिक पिके घेतली जातात. हंगामी पिकात भात, वाटाणा, कडधान्ये, संकरित ज्वारी, सोयाबीन, भुईमूग अशी महत्त्वाची पिके घेतली जातात. जूनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड केली. वेण्णा नदीलाही थोडेफार पाणी वाहू लागले आणि तालुक्यातील पश्चिम भागात केळघर, कुडाळ, करहर या विभागात शेतकऱ्यांनी शंभर टक्के पेरण्या पूर्ण केल्या. पिके जोमात आलेली असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही तर भयानक स्थिती निर्माण होईल.