शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

कऱ्हाड : पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची, बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचीही आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली ...

कऱ्हाड : पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची, बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचीही आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक रस्ते, दुभाजक, पादचारी मार्गावर अग्निशमन बंबाच्या साह्याने वेळोवेळी औषध फवारणी तसेच पाणी मारून स्वच्छता केली जात आहे. तसेच ज्याठिकाणी कचरा साचतो तो परिसरही पालिकेकडून स्वच्छ केला जात आहे.

श्वानांची दहशत (फोटो : २४इन्फोबॉक्स०२) कऱ्हाड : तालुक्यातील विंग व परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट श्वानांची दहशत वाढली आहे. श्वानांची संख्या जास्त असून, ते रात्रीच्यावेळी दुचाकी चालकांवर हल्ला करत आहेत. अचानक गाडीवर हल्ला केल्याने अपघात होत आहेत. श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

पालिकेचा वॉच

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंड केला जात आहे. पालिका प्रशासनाने कारवाईसाठी एक पथकही स्थापन केले आहे. या पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संबंधितांना पकडून त्यांना दंडही केला जात आहे.

मल्हारपेठला गर्दी

मल्हारपेठ : मल्हारपेठ ही पाटण तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. याठिकाणी कपडे तसेच सोन्या-चांदीची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या विवाह समारंभ सुरू असून त्याच्या खरेदीसाठी विभागातील अनेक गावांतील ग्रामस्थ बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजारपेठ गजबजल्याचे दिसून येत आहे.

नाल्यांची दुरवस्था

कऱ्हाड : पुणे -बंगळुरु राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येऊन पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, आटके, नारायणवाडी, वाठार, मालखेड अशा ठिकाणी गटारात कचरा साचत आहे.