शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘आरक्षण’ नव्हे ‘सुविधां’साठी जागा !

By admin | Updated: August 16, 2015 21:50 IST

मलकापुरात बैठक : ‘अहमदाबाद पॅटर्न’प्रमाणेच होणार विकास

मलकापूर : मलकापुरात अधिकारी, पदाधिकारी व अन्यायनिवारण समितीची नुकतीच संयुक्त बैठक झाली. बैठकीत ‘अहमदाबाद पॅटर्न’नुसारच शहराचा विकास करण्यावर सर्वांचे एकमत झाले. मात्र बैठकीत जमीन एकत्रिकरणातून सुविधांसाठी जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मलकापूर, ता. कऱ्हाड येथे सध्या शहर विकास आराखडा हा शहराच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी नगरविकास विभागाने हरकती व सूचना मागवल्या आहेत. सहाशेपेक्षा जास्त हरकती व सूचनाही जमा झाल्या आहेत. त्याची सुनावणी होण्यापूर्वी अन्याय निवारण समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्रथम आरखडाच रद्द करावा, अशी मागणी अन्याय निवारण समितीने केली व टी. पी. पद्धतीने जागा उपलब्ध करून शहराचा विकास करावा, अशी सूचनाही सदस्यांनी मांडल्या. यावर कलम ३० नुसार समावेश केलेल्या पद्धतीनुसार विकास करण्यावर नगरपंचायत पदाधिकारी ठाम आहेत. तसा ठरावही सभागृहात केला असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले. मलकापूरच्या भवितव्याचा विचार करता शहराच्या सर्व जागा आरेखामध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर शासनाच्या कलम ३१ नुसार प्रसिद्ध नकाशास आमचा विरोध असल्याचे विराधी कृती समितीचे अशोकराव थोरात व सदस्यांनी स्पष्ट केले.चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कोणत्याही एका व्यक्तीवर अन्याय होणार नाही, हे स्पष्ट केले. कलम ३० नुसारच नकाशा शासनाने मान्य करावा या भूमिकेवर आम्हीही ठाम आहोत. सुनावणीदरम्यान सर्व पदाधिकारी नगररचना उपसंचालकांना भेटून आपली बाजू मांडणार आहेत. ‘अहमदाबाद पॅटर्न’नुसार विकास करत असताना त्या त्या भागातील सर्व मिळकतदारांना जमीन एकत्रिकरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) बांधकाम करण्यास बंदी... -मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी ‘अहमदाबाद पॅटर्न’ची माहिती दिली. त्यानंतर टी. पी. स्कीम नुसार शहराचा विकास करण्यावर सर्वांचे एकमत झाले. यापुढील काळात जमीन खरेदी-विक्री करण्यास अडचण नसून बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. एन. ए. चा दाखलाही सभागृहापुढे आल्यानंतरच दिली जाईल व अपार्टमेंट बांधकाम थांबवले असल्याचेही उपनगराध्यक्ष शिंदे यांनी स्पष्ट केले.