शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणात महिला ‘राजी’ तर पतींची ‘ना’ राजी

By admin | Updated: April 15, 2015 23:58 IST

कऱ्हाड तालुका : ९९ ग्रामपंचायतीत महिला तर ९५ ग्रामपंचायतींमध्ये पुरुषांना मिळणार सरपंचपदाची संधी

कऱ्हाड : प्रत्येक क्षेत्रात महिलांना आरक्षण दिले जावे, असे सांगत महिलांना आरक्षण दिले गेले. मात्र, आता निवडणूक विभागाने महिलांना आरक्षण देत कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी संधी दिली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींत महिला, तर ९५ ग्रामपंचायतींमध्ये पुरुष सरपंचपद आरक्षित केले आहे.या आरक्षण निवडीतून महिलांना देण्यात आलेल्या संधीचे महिला वर्गातून ‘राजी’ होत स्वागत करण्यात आले आहे, तर दुसरीकडे पुरुषांमधून आपल्याला काही ठिकाणी संधी न मिळाल्याने ‘ना’ राजी व्यक्त होत आहे.कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण जाहीर झाले. या जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी महिला पद आरक्षित ठेवण्यात आले आहे. तर ९५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी पुरुषपद आरक्षित ठेवण्यात आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सरपंचपदासाठी जास्त आरक्षित ठेवण्यात आली असल्याने आता ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या खुर्चीवर बसून मोठ्या दिमाखात आता कारभारीनीही गावचा कारभार चालवणार आहेत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपद आता महिलांना भूषविण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने महिलांसाठी आरक्षणामुळे दिलेल्या संधीचे महिलांवर्गातून निवडणूक विभागाचे स्वागत केले जात आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या कारभारात महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याने पुरुष वर्गातून नाराजी व्यक्त होतआहे.जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी पडलेल्या आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला वर्गात ५५ महिलांचा समावेश असून, ५४ पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गात १६ महिलांची आणि १६ पुरुष वर्गाची आरक्षित संख्या ठेवण्यात आली आहे. तर अनुसूचित जमाती महिला आरक्षणात एक जागा तीही महिलासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. मागास वर्गामध्ये पुरुषांसाठी २६ आणि महिलांसाठी २७ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.सर्वसाधारण वर्गासह अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती, मागास वर्ग अशा चार वर्गांमध्ये ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी )कुठे सूनबाई तर कु ठे सासूबाई कऱ्हाड तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंचपदासाठी आरक्षित केले असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी कुणाची नियुक्ती करायची याची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे. तर कुठे गावातील सूनबाईला तर कु ठे अनुभव असणाऱ्या सासूबाईला संधी द्यायची, अशी चर्चा होत आहे.कारभारात आता ‘कारभारीणीही’घराप्रमाणे गावातील प्रत्येक गोष्टीचा कारभार हा ‘कारभाऱ्याने’ म्हणजे पुरुषांनी हाकायचा असतो. ही कारभाराची संकल्पना फार वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. मात्र, आता बदलत्या काळानुसार गावाचा कारभार चालवण्यामध्ये महिला वर्ग मागे नसल्याचे दिसून येत आहे. त्यात आताच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणावर लक्ष दिल्यास यामध्ये पुरुषवर्गापेक्षा जास्त महिलांची संख्या आहे. त्यामुळे आता नव्या प्रशासनाच्या नव्या निवडीनुसार गावच्या कारभारात आता कारभारीनीलाही आपली कसब दाखवता येणार आहे, हे नक्की. तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने तालुक्यातील गावागावांत सरपंचपदासाठी कु णाला उभे करायचे, याविषयावर सध्या चर्चा केली जात आहे.