शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फुटक्या कालव्याची आजपासून दुरुस्ती

By admin | Updated: August 18, 2015 00:42 IST

अभियंत्यांकडून पाहणी : शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान

कोरेगाव : अंबवडे संमत कोरेगाव येथे शनिवारी दुपारी फुटलेला धोम डावा कालवा आजही (सोमवार) फुटलेल्या अवस्थेत कायम आहे. पाण्याचा विसर्ग कमी केला असला तरी पाण्याचा पाझर कायम असल्याने फुटलेल्या ठिकाणाहून पाणी वाहत होते. कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी सोमवारी दुपारी या कालव्याची पाहणी केली. मंगळवारपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असून, त्यामध्ये सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यकत केला आहे, प्रत्यक्षात दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. फुटलेल्या कालव्याची परिस्थिती सोमवारी बिकट झाली. पाण्याच्या प्रवाहामुळे फुटलेल्या ठिकाणाला विहिरीचे स्वरूप आले आहे. पाणी इतरत्र पोट कालव्यांमध्ये वळविले असले तरी पाझरामुळे पाणी वाहत असून, ते ओढ्याला जाऊन मिळत आहे. धोमचे कार्यकारी अभियंता टी. डी. जाधव यांनी उपअभियंता एस. एम. गोडसे व शाखा अभियंता एस. एन. बगाडे यांच्यासमवेत फुटलेल्या ठिकाणाची पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याचे बगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) तहसीलदारांची नोटीस तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना सोमवारी सकाळीच नोटीस बजावली असून, घटनेची माहिती का दिली नाही, याबाबत स्पष्ट शब्दात विचारणा केली. रांजणे यांनी किन्हईचे मंडलाधिकारी एस. के. घनवट व तलाठी आर. एम. पवार यांना कालवा फुटून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनवट व पवार यांनी पंचनामा केला असून, त्यामध्ये आले पिकांचे झालेले नुकसान, वाहून गेलेली जमीन, ठिबक सिंचन योजनेची झालेली दुरवस्था, गाळाने भरलेली विहीर व त्यातील मोटारींची नोंद केली असून, प्राथमिक ६ लाख ७० हजारांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे.