शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आकाशा’शी जडले नाते जिवाभावाचे

By admin | Updated: July 18, 2014 23:34 IST

सातारकरांची सहृदयता : ‘लोकमत’च्या आवाहनानंतर उपचारांसाठी दीड लाखांपेक्षाही जास्त रक्कम जमा

सातारा : शेंदुरजणे येथील आकाश मुकुंद येवले या चिमुकल्याच्या उपचारांसाठी मदतीचे असंख्य हात धावून आले आहेत. आता त्याच्या उपचारास लागणारी बहुतांश रक्कम येवले कुटुंबीयांकडे जमा झाली असून, मदतीचा आकडा दीड लाखांपेक्षाही पुढे गेला आहे. ‘घनतिमिरी दिसेना वाट... कुटुंब शोधतेय कवडसा’ या शीर्षकाखाली दि.१४ च्या ‘लोकमत’मध्ये आकाशच्या आजाराविषयी आणि कुटुंबाच्या झालेल्या कोंडीविषयी वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात मेंदूत ताप गेल्याने आकाश अंथरुणाला खिळला. त्याच्या उपचारांसाठी प्रचंड खर्च होणार असल्याने आणि येवले कुुटुंबाची तशी परिस्थिती नसल्याने त्याचे आईवडील प्रचंड तणावाखाली होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दानशूरांचे असंख्य हात पुढे आले. सर्व स्तरातील लोकांनी आपापल्या परीने आकाशला मदत करण्याचे ठरविले. शाळकरी मुलांनीही खाऊचे पैसे आकाशसाठी दिले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीमधून पैसे दिले. सातारचे माजी नगराध्यक्ष कोंडिराम रामभाऊ सावकार यांचा लोकसेवेचा वारसा त्यांच्या पुढील पिढीने जपला. कोंडिराम सावकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त गौरव सावकार आणि अक्षय सावकार या त्यांच्या नातवांनी तब्बल पन्नास हजार रुपयांची मदत आकाशला दिली. सातारच्या कन्याशाळेत मुलींनी एक खोके आणून ‘लोकमत’च्या वृत्ताचे शीर्षक त्यावर लिहिले. या खोक्यात मुलींनी यथाशक्ती पैसे टाकले. तसेच बंदिस्त खोके त्यांनी आकाशचे वडील मुकुंद येवले यांच्या स्वाधीन केले. आकाशला मदत करण्यासाठी सातारा शहराबाहेरील नागरिकांनीही धाव घेतली. कऱ्हाडच्या आगाशिवनगर येथील सागर नवनाथ शिरसट या सिमेंट-पाईप व्यावसायिकानेही आकाशला दहा हजार रुपयांची मदत केली आहे. विशेष म्हणजे, राजवाडा भाजीमंडईत बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांच्या ग्रुपनेही याकामी पुढाकार घेतला. आपापल्या कुवतीनुसार पैसे जमा करून त्यांनी ते आकाशच्या आईवडिलांना दिले. यात शेतकरी आणि भाजी व्यापारी दोहोंचा समावेश होता. वासंती परदेशी, अंकुश पवार, नासीर शेख, बिस्मिल्ला बागवान, इंदुबाई राजपुरे या भाजीविक्रेत्यांनी याकामी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी) कोरेगावचे चाळकरीही वर्गणी गोळा करून धावले बेडवर खिळलेला आकाश सुशिक्षित असला तरी त्याच्या हातात ताकद कमी. आई-वडिलांचाही कधी लिखाणाशी संबंध आलेला नाही; तरीही खूप प्रयत्न करून आकाशच्या ‘लोकमत’बद्दलच्या भावना अशा पध्दतीने व्यक्त करण्यात आल्या. आकाशच्या प्रकृतीसंबंधीचे वृत्त वाचून कोरेगावच्या विश्वविनायक कॉलनीत (भिलार वस्ती) राहणारे काही चाळकरी अस्वस्थ झाले. कुमठे फाट्याजवळ ही चाळवजा वसाहत आहे. त्यांनी एकत्र येऊन आकाशसाठी काही करायचे ठरविले आणि वर्गणी काढून आकाशच्या वडिलांच्या हातात बंद पाकीट दिले. विशेष म्हणजे, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मदत देणाऱ्यांमध्ये नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पैसे देणाऱ्यांचा समावेश सर्वाधिक होता. आता आकाशच्या उपचारासाठी आवश्यक निधी जमा झाला आहे.