शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवडला : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Updated: August 25, 2015 23:05 IST

शासनाचा हिरवा कंदील : जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले पत्र

सातारा : ‘उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे होणार होते. मात्र, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित होता. अखरे वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे म्हसवड येथे पुनर्वसन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण जि. सातारा येथे १३९.५५ हेक्टर क्षेत्रावर करण्याचा निर्णय झाला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या; मात्र पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नेहमीच उडवाउडवीची उत्तरे आणि टाळाटाळ केली जात होती. यामुळे हतबल झालेल्या वेणेखोल प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. पुनर्वसन म्हसवड येथे करण्याचे नियोजित असताना प्रशासनाने अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा घाट घातला होता. यासंदर्भात पुनर्वसन मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असताना वेणेखोल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत त्यांना निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. मंत्रालयातील महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी प्र. रा. मुंढे यांनी वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड येथे करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे पत्र सातारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना दि. ७ आॅगस्ट २०१५ रोजी पाठवले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड येथे करण्यास मान्यता दिल्याने वेणेखोल प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम हा निर्णय झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असून, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले