शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून भरपाई

By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST

शेतकऱ्यांत समाधान : कुसूर परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारूख परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भुईमुगासह इतर पिकांचे व पाळीव प्राण्यांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. परिणामी वनविभागाकडून तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तारूखसह बामणवाडी, शिबेवाडी, पवारवाडी, वानरवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यावस्त्या पूर्णता: डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. चारी बाजूने घनदाट झाडी झुडपे असल्याने वनक्षेत्र असल्याने या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. वनक्षेत्राला लागून शेतकऱ्यांच्या शेत जमिनी असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. तर हिंस्त्र वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारली जात आहेत. रानटी डुकरांकडून भुईमुग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आल्याने वनपाल आर. डी. माळी आणि वनरक्षक बेंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर तत्काळ पाहणी करून पिकांचे पंचनामे केले. हा पंचनामा वरिष्ठांकडे पाठविला. वरिष्ठांनीही दखल घेऊन तत्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्यात आली. शिवाजी चाळके, सुभद्रा चाळके, आनंदा पाटील, बाबूराव चाळके, अरुण शिबे आणि आनंदा शिंदे, शिंबेवाडी येथील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटी वनविभागाकडून प्रत्येकी २८ हजार १५९ रुपये देण्यात आले.तसेच तारूख येथील भगवान शिरतोडे, चंद्रकांत पवार, पवारवाडी आणि रघुनाथ पाटील, शिबेवाडी या शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेल्या त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर) मदतीपासून शेतकरी अनभिज्ञवन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते हे बहूतांश शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरीही अनेक शेतकरी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. परिणामी, त्यांना मदतीपासून वंचित रहावे लागते.... यांना मिळते भरपाई !वानर आणि साळींदर या प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून कसलीच नुकसान भरपाई दिली जात नाही. मात्र, रानडुक्कर, माकड, हत्ती या प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते तसेच हिंस्त्र प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारल्यास नुकसान भरपाई दिली जाते.