शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून भरपाई

By admin | Updated: October 31, 2015 00:09 IST

शेतकऱ्यांत समाधान : कुसूर परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारूख परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भुईमुगासह इतर पिकांचे व पाळीव प्राण्यांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. परिणामी वनविभागाकडून तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तारूखसह बामणवाडी, शिबेवाडी, पवारवाडी, वानरवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यावस्त्या पूर्णता: डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. चारी बाजूने घनदाट झाडी झुडपे असल्याने वनक्षेत्र असल्याने या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. वनक्षेत्राला लागून शेतकऱ्यांच्या शेत जमिनी असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. तर हिंस्त्र वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारली जात आहेत. रानटी डुकरांकडून भुईमुग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आल्याने वनपाल आर. डी. माळी आणि वनरक्षक बेंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर तत्काळ पाहणी करून पिकांचे पंचनामे केले. हा पंचनामा वरिष्ठांकडे पाठविला. वरिष्ठांनीही दखल घेऊन तत्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्यात आली. शिवाजी चाळके, सुभद्रा चाळके, आनंदा पाटील, बाबूराव चाळके, अरुण शिबे आणि आनंदा शिंदे, शिंबेवाडी येथील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटी वनविभागाकडून प्रत्येकी २८ हजार १५९ रुपये देण्यात आले. तसेच तारूख येथील भगवान शिरतोडे, चंद्रकांत पवार, पवारवाडी आणि रघुनाथ पाटील, शिबेवाडी या शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेल्या त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर) मदतीपासून शेतकरी अनभिज्ञ वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते हे बहूतांश शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरीही अनेक शेतकरी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. परिणामी, त्यांना मदतीपासून वंचित रहावे लागते. ... यांना मिळते भरपाई ! वानर आणि साळींदर या प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून कसलीच नुकसान भरपाई दिली जात नाही. मात्र, रानडुक्कर, माकड, हत्ती या प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते तसेच हिंस्त्र प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारल्यास नुकसान भरपाई दिली जाते.