शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या डोंगररांगामधील रानमेवा यंदा लांबला...

By admin | Updated: April 7, 2015 01:17 IST

अवकाळी पाऊस : गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम

लक्ष्मण गोरे -बामणोली  -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये पाटण, सातारा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर दरवर्षी, तोरणे आंबुळगी, करवंदे, जांभळे, आळू, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षी मार्च महिन्यापासून मे-जून पर्यंत हा रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो; परंतु चालूवर्षी अनेकवेळा झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम या रानातील फळपिकांवर झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे अनेक गरीब शेतकरी हवालदिल झाले आहेत.दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत वेलीवर झुडपात येणारी ‘आंबुळगी’ ही फळे पिकण्यास सुरुवात होते. या फळानंतर तोरणे, जांभळे, आळू, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. परंतू सध्या एप्रिल महिन्याचा एक सप्ताह संपला तेव्हा आता ‘आंबुळगी’ पिकण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने अनेक फळांचा मोहोर व फुले गळून गेल्याने गतवर्षीच्या तुलनेत ही सर्व फळे कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. ‘तोरणे’ हे काटेरी झुडपाला येणारे एक बीज फळही अजून पिकण्यास सुरुवात झाली नाही. हे फळ पांढऱ्या रंगाचे चवीला गोड व साधारण तुरट असे असते. फळाचा आकार लहान मण्यांएवढा असते. याचप्रमाणे करवंदे व जांभळे या पिकांचीही अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कच्ची करवंदे व जांभळे तयार झाली आहेत. तर अनेक करवंदी या काटेरी झुडपांना व जांभळांच्या झाडांना मोहोर आला आहे. यामुळे यावर्षी सुमारे एक ते दोन महिने या फळांचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे. यंदा उशिराने सुरू होणाऱ्या ‘रानमेव्या’मुळे अनेक गरीब शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पाटण तालुक्याच्या कोयनानगर, हेळवाक व नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग जावळी तालुक्याचा कास-बामणोली विभाग व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागातील हजारो शेतकरी आंबुळगी, तोरणे, करवंदे यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात व पावसाळ्यासाठीचा बाजारहाट खरेदी करतात. अनेक गरीब शेतकरी कुटुंबे यातून हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल करत असतात; परंतु सध्या फक्त आंबुळगी या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आणि फळे कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.रानमेवा तयार होऊन पिकण्याचा हंगामदरवर्षी फेबु्रवारी महिन्यात ‘आंबुळगी’ हे एकबीज फळ वेलीवर पिकून तयार होते. याचा हंगाम महिनाभर चालतो. कास पठार परिसर उंचावर हे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. या फळानंतर ‘तोरणे’ हे एकबीज पांढरे फळ मार्च महिन्यात काटेरी झुडपाला येते हे. तुरट व चवीने गोड फळ आहे. यानंतर जांभळे, करवंदे, आंबे, आळू ही पिके लागोपाठ एप्रिल-मे महिन्यांत तयार होतात.मागीलवर्षी फेबु्रवारी महिन्यात आम्ही बारा दिवस आंबुळगी व मार्च महिन्यात १६ दिवस तोरणे पाटीभरून नेऊन सातारला विक्री केली होती; परंतु यावर्षी अजून तोरणे पिकण्यास सुरुवातही नाही. आंबुळगी गेल्या आठवड्यापासून पिकण्यास आताच सुरुवात झाली आहे. तसेच यावर्षी फळेही कमी असल्याने जमा करण्यास व विकण्यासही वेळ होत आहे. यामुळे आम्हाला दुसरा व्यवसाय व मोलमजुरी करावी लागत आहे.-शंकर साळुंखे, शेतकरी, भोंबवली, ता. सातारा