शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या अंगावर धावले संतप्त नागरिक !

By admin | Updated: May 21, 2015 00:04 IST

करंजेत ‘रास्ता रोको’ : भरउन्हाळ्यात पाणी नसल्याने संतापाचा उद्रेक; प्राधिकरणच्या अधिकाऱ्याचा काढता पाय

सातारा : भरउन्हाळ्यात शनिवारपासून करंजे पेठेतील निम्म्या भागाला पाणी नसल्यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले. करंजेत येणारे सर्व रस्ते रोखून धरतानाच त्यांनी सातारा-पुणे मार्गावरील वाहतूकही बुधवारी सकाळी काही काळ अडविली. जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी या भागास भेट दिली असता त्यांच्या अंगावर नागरिक धावून गेले. अखेर पोलीस संरक्षणात मेंगे यांना काढता पाय घ्यावा लागला.सकाळी नऊपासूनच संतप्त करंजेकर रस्त्यावर जमले होते. कळशा, बादल्या, हंड्यांबरोबरच दुचाकी वाहने आडवी लावून त्यांनी परिसरातील पाच रस्ते रोखून धरले. सातारा-पुणे मार्गावरही ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागल्यावर पोलीस घटनास्थळी आले. ‘पुणे-सातारा रस्ता अडविल्यास गुन्हा दाखल करावा लागेल,’ अशी समज दिल्यानंतर नागरिकांनी केवळ अंतर्गत रस्ते सुमारे दीड तास अडवून धरले. आंदोलनाला अटकाव करणाऱ्या पोलिसांबरोबरहीपालिकेविषयी संतापआंदोलनस्थळी पोलीस तैनात करण्यात आले; मात्र पालिकेतर्फे कोणीच फिरकले नाही, हे पाहून नागरिकांचा पारा चढला. अद्याप पाणीपट्टी पालिकेतच जमा करावी लागत असल्याने आणि प्रभागातील चारही नगरसेवकांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने पोलिसांचे न ऐकता नागरिक थेट अंत्यसंस्काराच्या गाडीत बसले आणि पालिकेच्या दिशेने मोर्चा वळविला.