राजेंद्र चावलानी भारत निर्माण पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:39 IST2021-03-05T04:39:16+5:302021-03-05T04:39:16+5:30

वाई : दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नवी दिल्ली येथील प्रमोटिंग ॲचिव्हमेंट ...

Rajendra Chawlani honored with Bharat Nirman Award | राजेंद्र चावलानी भारत निर्माण पुरस्काराने सन्मानित

राजेंद्र चावलानी भारत निर्माण पुरस्काराने सन्मानित

वाई : दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नवी दिल्ली येथील प्रमोटिंग ॲचिव्हमेंट फाऊंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार नुकताच मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफाॅरमन्स अँड आऊटस्टॅंडिंग काॅन्ट्रिब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरुण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार करण्यात आला.

चावलानी म्हणाले, ‘कै. पोपटशेठ ओसवाल व वाई अर्बन परिवाराचे मान्यवर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच बँकेच्या माध्यमांतून सहकारात प्रदीर्घ काम करण्याची संधी मिळाली. सर्वांच्या सहकार्यामुळे मी बँकेचा संचालक म्हणून समर्थपणे धुरा सांभाळू शकलो.’

याप्रसंगी बँकेचे संचालक डाॅ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, सीए. राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डाॅ. शेखर कांबळे, स्वरुप मुळे, अंजली शिवदे, गीता कोठावळे, सीए. किशोरकुमार मांढरे, अनिल देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, सुहास पानसे आदी उपस्थित होते.

(वा. प्र.)

०४वाई जाहिरात

फोटो ओळी : वाई येथे राजेंद्र चावलानी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सीए. चंद्रकांत काळे, श्रीपाद कुलकर्णी, अरुण देव आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Rajendra Chawlani honored with Bharat Nirman Award