शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस तर पळालाच; उन्हानं जळतंय पीक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 21:30 IST

कोरेगाव : घेवडा उत्पादक शेतकऱ्यांची केविलवाणी परिस्थिती

वाठार स्टेशन : रब्बी हंगामाच्या प्रारंभालाच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या व कोरेगाव तालुक्यात सर्वत्र पेरणी प्रक्रिया गतिमान झाली; परंतु पेरणी नंतर पावसाने दडी मारल्याने आता शेतकरीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. एकवेळ काही दिवस पाऊस नाही पडला तरी चालेल; पण ढगाळ वातावरण तरी राहावे अशीच मागणी आता कोरेगाव तालुक्यातील घेवडा उत्पादक शेतकरी करू लागला आहे. कोरेगावच्या घेवड्यास आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा प्राप्त झाल्याने यावर्षी घेवडा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून तालुक्यात घेवड्याची ७ हजार ८७३ हेक्टर या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. घेवड्यासाठी पोषक हवामान व व रिमझिम पाऊस असे वातावरण राहिल्यास पीक चांगले मिळते. यामुळे घेवडा हे कोरेगाव तालुक्याचे हुकमी पीक बनले आहे. घेवड्यास एकवेळ कमी पाऊस असला तरी चालतो; पण उन्हाचा तडाखा चालत नसल्याने घेवडा पिकास आता उन्हापासून धोका निर्माण झाला आहे. एका बाजूने कोरेगावचा घेवडा जगाच्या बाजारपेठेत पोहोचला असताना या घेवड्याचा समावेश मात्र अद्याप शासनाच्या पीक विम्यात झाला नाही. त्यामुळे या घेवडा उत्पादक शेतकऱ्यावर हे दुहेरी संकट कोसळले आहे. त्यासाठी शासनाने या पिकाचा समावेश विम्यात करावा ही अनेक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची मागणी आहे. सद्य:स्थितीत उन्हामुळे घेवड्याचे पीक वाया जाण्याचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी दमदार पाऊस पडलाच नसता तर किमान शेतकऱ्याचा पेरणीसाठी पैसा तरी वाया गेला नसता; पण आता मात्र पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. कोरेगाव तालुक्यातील घेवडा संकटात सापडला आहे. पावसाने अगदी अजून महिनाभर दडी मारली तरी शेतातील असलेल्या ओलीवर पीक व्यवस्था जिवंत राहील; परंतु उन्हाच्या तडाख्यातून पिकांचे संरक्षण कोण करणार? हा प्रश्न आहे. (वार्ताहर)कोरेगाव तालुक्याची शान असलेला वाघ्या घेवड्याच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली आहे. भविष्यात या घेवड्यास मोठा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये शासनाच्या एका कार्यक्रमात कोरेगावच्या घेवड्यास अंतरराष्ट्रीय जी. आय. मानांकनाचा दर्जा मिळाल्याने एका बाजूने शेतकऱ्यांच्या या पिकाबाबत आशा पल्लवित झाल्या. तर आता सध्याच्या वाढत्या उन्हामुळे घेवड्याचे पीक हाती लागणे अवघड वाटू लागले आहे.- मनोज कदम, शेतकरी देऊरघेवडा वाचविण्यासाठी धडपड...गतवर्षी कोरेगाव तालुक्यात ६ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रात घेवड्याची पेरणी झाली होती. मात्र, बाजारपेठेतील अस्थिर दरामुळे घेवड्यास योग्य बाजारभाव मिळाला नव्हता. या हंगामात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, जवळपास ७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यावर्षी वरुण घेवड्याचे बी ५० ते ६० रुपये तर वाघा घेवड्याचे बी ८० ते १०० रुपयांपर्यंत खरेदी करून या भागातील शेतकऱ्यांनी घेवड्याची पेरणी केली आहे. मात्र आज ज्यांच्याकडे पाणी आहे, असेच शेतकरी घेवडा वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.