शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: उंची २ फूट ८ इंच, वजन २८५ किलो; मलवडीच्या ‘राधा’ची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:31 IST

ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता

नवनाथ जगदाळे

दहिवडी : जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ती दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने राधाला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. २१ डिसेंबर २०२४ सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने सहभाग घेतला अन् तिथूनच तिचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगाव, कर्नाटकातील निपाणी यांसह १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले.

२४ जानेवारी २०२५ रोजी राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. यात पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १२ सप्टेंबर २०२५ला राधाची पाहणी करून अहवाल पाठवला. २० सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली व शेवटी २८ ऑक्टोबर रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली.

उंची : २ फूट ८ इंच
वजन : २८५ किलो

आमची राधा प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, सामान्य शेतकऱ्यांसह अनेक मान्यवर व तज्ज्ञांच्या आकर्षणाची ती केंद्रबिंदू ठरत आहे. राधाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात राधाला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अनिकेत बोराटे, म्हशीचे मालक

English
हिंदी सारांश
Web Title : Satara's 'Radha' enters Guinness World Records with her unique height!

Web Summary : Malwadi's 'Radha,' a dwarf buffalo, entered the Guinness World Records. Owned by Trimbak Borate, Radha's unique height of 2 feet 8 inches made her famous after Aniket Borate showcased her at agricultural exhibitions. Her recognition brings pride to her owners.