शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची एसटीसाठी परवड; सदस्य विमानाने ‘टूर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

पाटण : कोरोना महामारीशी लढताना एकीकडे दुर्गम पाटण तालुक्यातील जनतेला एसटी मिळविण्यासाठीही जिवाचा आटापिटा करावा लागतोय. मात्र, याच कोरोना ...

पाटण : कोरोना महामारीशी लढताना एकीकडे दुर्गम पाटण तालुक्यातील जनतेला एसटी मिळविण्यासाठीही जिवाचा आटापिटा करावा लागतोय. मात्र, याच कोरोना महामारीत पंचायत समितीचे सदस्य मात्र विमानाने ‘टूर’वर गेलेत. लाखो रुपये खर्चून केरळ राज्यात काढण्यात आलेला हा अभ्यास दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला असून, या दौऱ्याचे फलीत काय, हा जनतेचा प्रश्न आहे.

तालुक्याचे मिनी सभागृह म्हणून ओळखल्या जाणार पाटण पंचायत समितीच्या फक्त महिला सदस्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन असताना नुकतेच केरळ राज्याच्या दौऱ्यावर सभापती, उपसभापतींसह काही सदस्यही गेले आहेत. या दौऱ्याची तालुक्यात मोठी चर्चा आहे. अभ्यासाला गेलेले सदस्य तालुक्यातील जनतेसाठी काय घेऊन येणार, हा संशोधनाचा विषय आहे. या दौऱ्यासाठी सुमारे पाच ते दहा लाखांचा खर्च अपेक्षित असून, केरळ येथे पोहोचण्यासाठी सदस्यांनी विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे. सभापती म्हणून राजाभाऊ शेलार, तसेच उपसभापती म्हणून प्रतापराव देसाई आणि गटविकास अधिकारी म्हणून मीना साळुंखे यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. पंचायत समितीच्या सभागृहात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाची सत्ता आहे, तर विरोधक म्हणून सध्याचे मंत्री शंभूराज देसाई यांचे सहा सदस्य आहेत. नुकतेच सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रितपणे अभ्यास दौरा म्हणून केरळ राज्यात ‘टूर’ काढली आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे अभ्यास दौरे आणि सहली पंचायत समिती सदस्यांनी अनुभवलेले आहेत. सदस्यांचा अभ्यास दौरा जरूर असावा. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. सभागृहात नवीनच आल्यानंतर पंचायत समिती सदस्यांना अशा अभ्यास दौऱ्याची गरज असते. मात्र, आता पंचायत समितीचा कार्यकाल केवळ एक वर्षाचा उरला असताना काढलेला अभ्यास दौरा हा जनतेसाठी फलदायी ठरणार की केवळ मौजमजा, हा प्रश्न आहे.

पंचायत समितीतील सदस्यांचा गत कार्यकाल पाहिला असता मोजकेच सदस्य जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने बोललेले दिसले तर अनेकजण मासिक सभेला दांडी मारतात. तसेच बरेचजण तोंडावर बोट ठेवून केवळ सभेला हजेरी लावण्यापुरते उपस्थित राहिलेले दिसतात. तेव्हा आता अभ्यास दौरा करून सदस्यांनी इतर राज्यांत काही पाहिले, अनुभवले तर त्याची परत आल्यावर तळमळीने अंमलबजावणी होते की नाही, हे पाहावे लागणार आहे.

गत पाच वर्षांच्या कार्यकाळात अभ्यास दौऱ्यासाठी विमानानेच गेलेले सदस्य प्लास्टिक मुक्तीचा आम्ही ध्यास घेऊन आलो आहे, असे सांगत होते; पण त्यांचा हा ध्यास अल्पकाळातच विरून गेला. तालुक्यात प्लास्टिक मुक्ती झालीच नाही. म्हणूनच अभ्यास दौऱ्याला गेलेल्या सदस्यांना आपण जाऊन काय केले, याचे अंतर्मुख होऊन विचार करणे भाग पडणार आहे.

- चौकट

केरळ कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’

सध्या सर्वत्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, राज्य सरकार ‘लॉकडाऊन’ करण्याच्या विचारात आहे. सर्वत्र सभा, यात्रा, समारंभ, सहली यावर बंदी आहे. असे असताना पाटण पंचायत समितीचे सदस्य केरळ राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. त्यातच केरळमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे अभ्यास दौऱ्यावरून परत येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांची तालुक्यात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.