शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चर्चा निष्फळ; ऊसदर आंदोलक रात्रभर झोपले कारखान्याच्या वजन काट्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:57 IST

संघटना व शेतकऱ्यांनी टनाला ऊसदर ३५०० रुपये मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली होती

विकास शिंदेफलटण : फलटण येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची ऊस दर चर्चा निष्फळ ठरल्याने सर्व शेतकरी बांधवांनी रात्रभर वजनकाट्यावर व कारखाना परिसरात झोपणे पसंत केले. साेमवार सकाळपासून शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी टनाला ऊसदर ३५०० रुपये मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली होती. दिवसभर मागण्या मान्य न झाल्याने शेतकरी थेट वजन काट्यावर झोपले.शेतकऱ्यांनी वजन काटा ताबा घेऊन कारखाना बंद पाडला. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास विनंती केली, परंतु सर्व शेतकऱ्यांना ३३०० दर अमान्य असून ३५०० चा दर निश्चित करावा व तसे लेखी पत्र द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. या आंदोलनाला कारखान्याच्या कामगार संघटनेने पाठिंबा देत कारखाना प्रशासन व शेतकरी यांच्यात मध्यस्थी केली.पुढील आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कारखाना प्रशासनातर्फे अजित जगताप यांनी दिल्यावर व कामगार संघटनेनी जबाबदारी घेतल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. ३५०० रुपये ऊसदर न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष अमरसिंह कदम, सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, पक्ष फलटण तालुकाध्यक्ष दादा जाधव, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, नाना शिपकुले, सूरज साळुंखे व तालुक्यासह साखरवाडी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Sugarcane Price Talks Fail; Protesters Sleep at Factory Weighbridge

Web Summary : Sugarcane price negotiations failed at Phaltan's Shri Dutt India sugar factory. Farmers demanded ₹3500 per ton, leading to a factory shutdown and overnight protest at the weighbridge. An agreement was reached after assurances of a decision within eight days. Further agitation was threatened if demands are unmet.