शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण पाटलांवर आगपाखड

By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST

पालिका सभा : रवींद्र पवार, दत्ता बनकरांसह जयेंद्र चव्हाण यांनी केले लक्ष्य

सातारा : सभेआधी दोन्ही आघाड्यांच्या चर्चेत जे मुद्दे मांडायचे ते भर सभेत मांडणाऱ्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्यावर दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी चांगलीच आगपाखड केली. रवींद्र पवारांनी तर त्यांना स्वीकृत नाही तर ‘विकृत नगरसेवक’ असे संबोधून सभेत बॉम्बच टाकला. तुमचा अभ्यास केवळ प्रसिध्दीसाठी न वापरता पालिकेच्या फायद्यासाठी वापरा, असा नमुनेदार सल्लाही जयेंद्र चव्हाण, अ‍ॅड. दत्ता बनकर व रवींद्र पवार यांनी पाटील यांना दिला. सभेने माजगावकर माळावर अद्ययावत फिश मार्केटसह ४६ विषयांना मंजुरी दिली.
आचारसंहितेच्या चक्रव्यूहात अडकलेली पालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर गुरुवारी (दि. ३) नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात झाली. पर्यावरण संरक्षण करणाऱ्या हरित इमारतीबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्याच्या विषयाबाबत माहिती देण्यासाठी नगरसेवक प्रवीण पाटील उठले. त्याचवेळी रवींद्र पवार, जयेंद्र चव्हाण व अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी त्यांना विरोध केला. ‘तुम्ही फक्त बोलता, प्रसिद्धीसाठी हे सगळं करताय का? सभेआधी दोन्ही आघाड्यांच्या बैठका होतात. त्यामध्येच बरेचसे धोरणात्मक निर्णय होतात. मात्र, तिथे पाटील आपले मत मांडत नाहीत. वास्तविक त्यांनी तिथेच मते व्यक्त करावीत. सभेचा वेळ वाया घालवू नये,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फिश मार्केट बांधण्याच्या विषयाची माहिती देताना पाटील यांनी दहा गुंठ्यांत कोल्ड स्टोअरेजची सुविधा असणारे अद्ययावत फिश मार्केट बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा जयेंद्र चव्हाण यांनी कोल्ड स्टोरेजसाठी किती तरतूद केली आहे? केवळ दिशाभूल करण्यासाठी काहीही माहिती देऊ नका, असे स्पष्ट केले. रवींद्र पवार यांनीही दिवसातले दोन तास पाटील पालिकेत असतात. या कालावधीत ते माहिती घेतात. ते बी.ई. इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा पालिकेला झाला. मात्र, त्यांनी ज्ञानाचा फायदा पालिका प्रशासनाला करून द्यावा. इलेक्ट्रिकल संदर्भातील विषय प्रशासनाने पाटलांना दाखवूनच घ्यावेत, अशी कोपरखळी मारली.
कचराकुंड्या खरेदीसंदर्भात जयेंद्र चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. आपले शहर कचराकुंड्यामुक्त आहे. आता पुन्हा शहरात कुंड्यांची संख्या वाढवून शहराला बकाल केले जाणार आहे का, असा प्रश्न त्यांनी मांडला. त्यावर आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांनी खुलासा करताना पूर्वीच्या कचरा कुंड्यांच्या दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच पालिकेचा कॉम्पॅक्टर एकावेळी १५ कुंड्यांतील कचरा रोज उचलतो. पूर्वी ९० कुंड्या होत्या. नवीन कुंड्या घेण्यामागे व्यक्तीश: कोणताही हेतू नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. स्थायी समितीनेही याला मंजुरी दिली असल्याचे सांगितल्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)